कौठा (नांदेड) – विकास नगर, कौठा येथील जिल्हा परिषद शिक्षक सहकारी गृहनिर्माण संस्था मर्यादित च्या जागेवर न्यायालयाचा मनाई हुकूम असतानाही काही व्यक्तींनी बेकायदेशीरपणे प्रवेश करून सभासदांमध्ये दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी संस्थेचे अध्यक्ष उत्तम शंकरराव वरपडे यांनी नांदेडच्या पोलीस अधीक्षकांकडे लेखी अर्ज देऊन संबंधितांवर कडक कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे. न्यायालयाच्या मनाई हुकमाचे उल्लंघन तक्रार अर्जानुसार, मा. न्यायालय नांदेड येथे दाखल ‘स्पेशल सिव्हील सुट क्र. ११६/२०२३’ अंतर्गत अक्षय भानुसिंह रावत, राजू गोविंदराव काळे व त्यांच्या सहकाऱ्यांना संबंधित जागेवर जाण्यास मनाई हुकूम देण्यात आलेला आहे. असे असतानाही, दि. ०३ ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी सुमारे ४:३० वाजेच्या सुमारास हे सर्व जण सोसायटीच्या जागेवर आले. त्यांनी सोसायटीतील सभासदांना त्रास देण्याच्या आणि भीतीचे वातावरण निर्माण करण्याच्या उद्देशाने जागेवर येऊन दहशत पसरवण्याचा प्रयत्न केला, असा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. पोलीस प्रशासनाकडे कडक कारवाईची मागणी दिनांक ०५ ऑक्टोबर २०२६ रोजी संस्थेचे अध्यक्ष उत्तम वरपडे यांनी पोलीस अधीक्षक कार्यालय, नांदेड व नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात अधिकृत तक्रार अर्ज सादर केला आहे. न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन करून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणाऱ्या तसेच गुन्हेगारी कट रचणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करून परिसरात न्याय व सुरक्षितता मिळवून द्यावी, अशी विनंती पोलीस प्रशासनाकडे करण्यात आली आहे. तक्रारदारांमध्ये सभासदांचा पाठिंबा या तक्रार अर्जावर अध्यक्ष उत्तम शंकरराव वरपडे यांच्यासह संस्थेचे सभासद पुनीत नरेंद्रापाल बरारा, पवन नरेशप्रसाद वारष्णी, सुंदर प्रेमचंदानी, अक्षय मोरे, संभाजी सर्जेराव नागरगोजे, संगीता जोशी, सुकेशा पुरोहित आणि सुंदरलाल प्रेमचंदानी यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. Kanthak Suryatal Post Views: 13 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation माहूर नवरात्रोत्सवासाठी प्रशासन सज्ज- जिल्हाधिकारी राहुल कर्डिले ठाण्याच्या गेटवर प्रियंका, रस्त्यावर जनता; हुकूमशाहीच्या अस्ताची हीच सुरुवात!