नायगाव (प्रतिनिधी) – नांदेड जिल्ह्यातील अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन करण्याच्या उद्देशाने सुरू असलेल्या विशेष मोहिमेत नायगाव पोलिसांनी अवैध विदेशी दारू वाहतुकीवर कारवाई केली. २६ ऑगस्ट २०२६ रोजी रात्री मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी नायगाव परिसरातील वडजे हॉस्पिटलजवळ सापळा रचून MH-12-NJ-2346 क्रमांकाची कार अडवली. पंचांसमक्ष वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये McDowell’s, Classic Gold Whisky, Vulcan, Royal Stag, Blue Whisky, Masters Delight Whisky यांसह विविध ब्रँडच्या विदेशी दारूच्या एकूण ४७७ बाटल्या आढळून आल्या. जप्त दारूची किंमत १ लाख १ हजार ७९० रुपये, तर दारू वाहतुकीसाठी वापरलेल्या कारची अंदाजे किंमत ५ लाख रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. असा एकूण ६ लाख १ हजार ७९० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणात विशाल बहादुरमल भंडारी (वय ४०, व्यवसाय वेटर, रा. घुंगराळा, ता. नायगाव), संजय शंकर बानेवाड (रा. नायगाव) आणि गणेश उर्फ गणपती गोविंदराव जाधव (रा. राणसुगाव, ह.मु. वडजे हॉस्पिटलजवळ, नायगाव) यांच्याविरुद्ध विनापरवाना विदेशी दारूची वाहतूक केल्याप्रकरणी महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमातील कलम ६५(अ) व ६५(ड) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांच्या आदेशाने, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती अर्चना पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आणि उपविभागीय पोलीस अधिकारी श्याम पानेगावकर यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. पोलीस निरीक्षक अमोल भगत, पोउपनि गजानन तोटेवाड यांच्यासह पोलीस अंमलदारांनी कारवाईत सहभाग घेतला. Kanthak Suryatal Post Views: 394 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation श्रीराम फायनान्सच्या तगाद्याला कंटाळून २८ वर्षीय युवकाची आत्महत्या; मृत्यूपूर्वी व्हिडिओत गंभीर आरोप ग्रामसभेत प्रश्न विचारल्याचा राग; भावास लोखंडी रॉडने मारहाण