या निवेदनात नांदेड जिल्ह्यातील अंध, मूकबधिर, बौद्धिक दिव्यांग, अस्थिव्यंग व इतर सर्व प्रवर्गांच्या दिव्यांग विद्यालयांची तातडीने विशेष तपासणी करावी, शिक्षक-कर्मचाऱ्यांची शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता, विद्यार्थ्यांची सुरक्षितता, निवासी व्यवस्था, अनुदानाचा वापर आदी बाबींची चौकशी करावी, तसेच विद्यार्थी व पालकांशी स्वतंत्रपणे संवाद साधून वस्तुस्थिती जाणून घ्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
मार्च २०२५ पासून बेरोजगार दिव्यांग कल्याणकृती संघर्ष समिती तथा सकल दिव्यांग संघटनेच्या माध्यमातून या प्रश्नासाठी निवेदने, आंदोलने, उपोषणे व मोर्चे काढून सातत्याने पाठपुरावा करण्यात आल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. काल संबंधित प्राधिकरणांना ई-मेलद्वारे निवेदन पाठविण्यात आले, तर आज जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद व पोलीस अधीक्षक कार्यालय, नांदेड येथे प्रत्यक्ष निवेदन सादर करण्यात आले. सदर मागण्यांवर सात दिवसांत ठोस कार्यवाही न झाल्यास कायदेशीर व शांततामय मार्गाने तीव्र लोकशाही आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.
