नांदेड, (प्रतिनिधी)-घरगुती वादातून शहीदपूरा भागात जावयाने सासूचा खुन केल्याचा प्रकार सायंकाळी पाच वाजता घडला आहे. प्राप्त झालेल्या माहितीनुसार शहीदपूरा भागातील गगनसिंग गणपतसिंग मिलवाले उर्फ लक्की याने घरगुती वादातून आपल्या ५५ वर्षीय सासू बलजीत कौर सिद्धू वय (५५) खंजीरच्या साह्याने जबर हल्ला केला. त्यांच्या पोटात आणि अनेक जागी वार केल्याने त्या जागीच मरण पावल्या. घटनेची माहिती मिळताच पोलीस उपअधीक्षक रामेश्वर व्येंजने, पोलीस निरीक्षक अजित कुंभार, पोलीस उपनिरीक्षक सुनिल बुलंगे यांच्यासह बरेच पोलीस हवालदार घटनास्थळी हजर झाले आहेत आणि पुढील कायदेशीर प्रकिया पूर्ण करत आहेत Kanthak Suryatal Post Views: 1,272 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation तलाठ्याकडून १२ हजारांची लाच मागणी; संशय आल्याने स्वीकारण्यास टाळाटाळ गोव्याच्या समुद्रकिनाऱ्यावर सायबर शिस्त आणि रुकम्या डाकूच्या पुत्राचे गोवा दर्शन ! फिक्स