नांदेड ग्रामीण (प्रतिनिधी) – बळीरामपूर येथे बनावट दस्तऐवज तयार करून प्लॉटधारकाची फसवणूक केल्याप्रकरणी सहा जणांविरुद्ध नांदेड ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिनांक 13 फेब्रुवारी 2026 रोजी सायंकाळी 4 वाजताच्या सुमारास बळीरामपूर, ता. जि. नांदेड येथे हा प्रकार घडला. या प्रकरणात गंगाधर जयराम सोनटक्के (रा. धनेगाव, नांदेड), खातूनबी शेख जफर (रा. धनेगाव), सय्यद महेबूब सय्यद अहमदसाब, अल्ताफ सुमाबी सय्यद महेबूब (रा. उस्माननगर), शबनम बेगम मोहम्मद साजिद इरफान (रा. खदकेनगर, इतवारा) आणि मोहम्मद साजिद इरफान मोहम्मद युसुफ खान (रा. उमर कॉलनी, नांदेड) यांचा आरोपी म्हणून समावेश आहे. आरोपींनी संगनमत करून जय हनुमान मागासवर्गीय सहकारी संस्था, बळीरामपूर तसेच इतर प्लॉटधारकांची बनावट दस्तऐवजांच्या आधारे फसवणूक केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी माधव उमाजी झुरेकर (वय 38, रा. इस्लापूर, ता. किनवट) यांनी नांदेड ग्रामीण पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. फिर्यादीवरून गुन्हा रजिस्टर क्रमांक 955/2026 नुसार भारतीय न्याय संहिता (BNS)-2023 मधील कलम 318(4), 336(2), 336(3), 338, 340(2), 340(3), 340(5) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोहेकॉ. भिसे करीत असून पोलिसांकडून कागदपत्रे व व्यवहारांची चौकशी सुरू आहे. Kanthak Suryatal Post Views: 644 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation माहूरमध्ये घरफोडी; सोन्याचे दागिने व रोख रकमेसह २२ हजार ५०० रुपयांचा ऐवज लंपास नांदेडमध्ये घरफोडी व हिसकावून चोरीच्या दोन घटना; लाखोंचा ऐवज लंपास