नांदेड (प्रतिनिधी)- शहरात घरफोडी तसेच रस्त्यावरून हिसकावून चोरी करण्याच्या दोन स्वतंत्र घटना घडल्याने नागरिकांमध्ये चिंता निर्माण झाली आहे. या दोन्ही प्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यांत गुन्हे दाखल करण्यात आले असून, पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू आहे. हाळी परिसरात घरफोडी; ६३ हजारांचा मुद्देमाल चोरीला इतवारा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील प्रतिभा निकेतन शाळेजवळ, हाळी, नांदेड येथे २० जून ते ३० जुलै २०२६ या कालावधीत अज्ञात चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. घरातील सोन्याचे दागिने असा एकूण ६३ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेला. याप्रकरणी विश्वनाथराव रामचंद्रराव पिपळे (वय ७९, रा. हाळी, इतवारा) यांच्या फिर्यादीवरून इतवारा पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक २७१/२०२६, भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम ३३१(४) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक गवळी करीत आहेत. मोटारसायकलवरून बोलत असताना मोबाईल हिसकावला दुसरी घटना शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. ९ ऑगस्ट २०२६ रोजी पहाटे सुमारे १.५० वाजता रेणुकाई हॉस्पिटल, महाराणा प्रताप चौक, नांदेड येथे फिर्यादी मोटारसायकलवर बसून फोनवर बोलत असताना एका अनोळखी इसमाने त्यांच्या हातातील व्हिवो कंपनीचा सुमारे ३० हजार रुपये किमतीचा मोबाईल हिसकावून पळ काढला. याप्रकरणी अविनाश मोहनराव मोकमपल्ले (वय ४१, रा. तानाजीनगर, नांदेड) यांच्या फिर्यादीवरून शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ३५०/२०२६, भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम ३०४(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोना काळे करीत आहेत. दोन्ही घटनांतील अज्ञात आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून तपासाची चक्रे वेगाने फिरविण्यात येत आहेत. Kanthak Suryatal Post Views: 444 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation बनावट कागदपत्रांद्वारे प्लॉटधारकाची फसवणूक; सहा जणांविरुद्ध गुन्हा लातूरात मटका व जुगार खेळणाऱ्यांवर पोलीस उप महानिरीक्षक यांच्या पथकाची धाडी; 27 आरोपींविरुद्ध कारवाई, 17 लाखांचा मुद्देमाल जप्त