पत्रकारांची पोलीस अधीक्षकांकडे जोरदार मागणी; दुसऱ्यांच्या बातम्या व्हायरल करण्यापेक्षा स्वतःच्या कृत्यांचा हिशेब द्या! नांदेड (प्रतिनिधी) – पत्रकारिता म्हणजे समाजाचा आरसा की अधिकाऱ्यांच्या डोक्यावर ठेवलेली खंडणीची तलवार? हा प्रश्न सध्या नांदेडच्या पत्रकारितेत चर्चेचा विषय ठरला आहे. इन्स्टाग्रामवर इंडिया नाऊ या नावाने सक्रिय असलेल्या मोहम्मद अली खान यांच्यावर शासकीय कार्यालयांमध्ये जाऊन अधिकाऱ्यांना दमदाटी करणे, पैशांची मागणी करणे आणि पैसे न दिल्यास बातमी व्हायरल करण्याची धमकी देणे, असे गंभीर आरोप पत्रकारांनी केले आहेत. त्यामुळे पत्रकारितेच्या नावाखाली नेमका कोणता उद्योग सुरू आहे, असा सवाल उपस्थित होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, उपनिबंधक कार्यालयातील एजंटांकडे पाच हजार रुपयांची मागणी करून, पैसे न दिल्यास बातमी प्रसिद्ध करण्याची धमकी दिल्याचा आरोप संबंधित व्यक्तीवर करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, याच प्रकरणात ५०० रुपयांचे पाकीट स्वतः घेतल्याचाही आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. आता पाच हजारांची मागणी आणि ५०० रुपयांच्या पाकिटाचा हा कथित प्रकार नेमका काय, याचा तपास पोलिसांनी करणे आवश्यक आहे. पत्रकार जाहिराती मागतात की खंडणी वसूल करतात, याचा निर्णय इन्स्टाग्रामवर व्हिडिओ टाकून होणार का? दिवाळीच्या सणात विविध वर्तमानपत्रांचे पत्रकार जाहिरातींसाठी शासकीय कार्यालये, अधिकारी आणि लोकप्रतिनिधींकडे जात असतात. ही पत्रकारितेतील परिचित व्यावसायिक बाब आहे. मात्र, जाहिरातीसाठी आलेल्या पत्रकारांचे व्हिडिओ तयार करून त्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप आहे. नामांकित वर्तमानपत्रांमध्ये काम करणाऱ्या पत्रकारांना व्हिडिओत दाखवून संपूर्ण पत्रकारितेलाच संशयाच्या पिंजऱ्यात उभे करण्याचा हा प्रकार असल्याचे तक्रारदारांचे म्हणणे आहे. स्वतःचे नाव इंडिया नाऊ, पण पत्रकारितेचा नेमका परवाना कुठला? इन्स्टाग्रामवर वृत्तवाहिनीचे नाव वापरून व्हिडिओ व्हायरल करणे म्हणजे अधिकृत पत्रकारिता नव्हे. दुसऱ्या नामांकित चॅनेलच्या नावाशी साधर्म्य असलेले नाव वापरून डुप्लिकेट पद्धतीने प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न होत असल्याचाही आरोप पत्रकारांनी केला आहे. पत्रकारितेचा मुखवटा लावून कोणाला बदनाम करणे, अधिकाऱ्यांवर दबाव आणणे आणि पैशांची मागणी करणे असे प्रकार खरोखर घडत असतील, तर तो पत्रकारितेचा सन्मान नसून तिच्या विश्वासार्हतेवरचा घाला आहे. पत्रकारितेच्या नावाने वसुलीचा संशय असेल, तर पोलिसांनीही व्हिडिओ पाहून नव्हे तर पुरावे तपासून कारवाई करावी! या प्रकरणी संबंधित व्यक्तीवर तातडीने गुन्हा दाखल करून आरोपांची निष्पक्ष चौकशी करावी, अशी मागणी पत्रकारांनी पोलीस अधीक्षक, विशेष पोलीस उपमहानिरीक्षक, जिल्हाधिकारी आणि जिल्हा माहिती अधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. निवेदनावर साहेबराव बेळे, बालाजी जाधव, भैय्यासाहेब गोडबोले, शेख मौला, शेख रफिक, वैजनाथ सोनटक्के, शिवाजी गोडबोले, अशोक झलारे, शिदोधन ढवळे, अच्युत बोईनवाड, आनंदा बोकारे, गंगाधर गच्चे, नकुल जैन, जनार्दन नामपले, चंद्रकांत जाधव, आशिष थोरात, मारुती स्वामी, अमोल शेळके, चंद्रभान सूर्यवंशी, आनंदा सोनटक्के, संजय पंडित, गंगाधर सूर्यवंशी, प्रकाश गजभारे, अमोल बचुटे आदी पत्रकारांच्या स्वाक्षऱ्या आहेत. आता पोलिसांसमोर खरा प्रश्न! पत्रकारांच्या नावाने कोणीतरी अधिकाऱ्यांना धमकावत असेल, पैशांची मागणी करत असेल आणि सोशल मीडियावर इतर पत्रकारांची बदनामी करत असेल, तर त्याची चौकशी होणे गरजेचे आहे. मात्र, आरोपांची सत्यता तपासण्याआधी कोणालाही दोषी ठरवणेही योग्य नाही. त्यामुळे संबंधित व्हिडिओ, पैशांच्या माग Kanthak Suryatal Post Views: 120 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation पुरुष संपले तरी महिला मोर्चा सांभाळणार! इराणच्या १० लाख जांफदायान महिला कमांडोंचा अमेरिकेला थेट इशारा!