देणग्यांवर डल्ला! हिंगोलीत मदरशाचा क्यूआर कोड घोटाळा उघड; ३ विश्वस्तांवर गुन्हा धर्माच्या नावाखाली स्वतःचे खिसे भरले! हिंगोलीत ऑनलाईन देणगी बनावप्रकरणी एटीएसची कारवाई हिंगोली (प्रतिनिधी) – धार्मिक आणि शैक्षणिक कार्यासाठी देणगीदारांकडून जमा होणाऱ्या रकमेवर स्वतःचा डोळा ठेवत खिसे भरण्याचा एक गंभीर प्रकार हिंगोलीत समोर आला आहे. किफायत एज्युकेशन वेलफेअर ट्रस्ट संचलित मदरशासाठी येणाऱ्या देणग्या परस्पर सहसचिवाच्या वैयक्तिक बँक खात्यात वळवून देणगीदारांची व शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी संस्थेच्या तीन उच्चपदस्थ पदाधिकाऱ्यांवर दहशतवाद विरोधी पथक एटीएसच्या तक्रारीवरून हिंगोली ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कसा उघड झाला हा डिजिटल बनाव? हिंगोली येथील लिंबाळा मका परिसरातील जामिया किफायतीयुल उलूम लिलबनात या मदरशात देणगीदारांकडून निधी गोळा करण्यासाठी ऑनलाईन पेमेंटचे क्यूआर कोड लावले होते. परंतु हे क्यूआर कोड संस्थेच्या अधिकृत खात्याचे नसून, संस्थेचा सहसचिव अतिकूर रहमान मसुदूर रहमान फारुकी याच्या वैयक्तिक बँक खात्याशी जोडल्याचे निष्पन्न झाले. दहशतवाद विरोधी पथक नांदेड युनिट, हिंगोली कॅम्प चे पोलीस अंमलदार रवींद्र धाबे यांनी २६ ऑगस्ट २०२६ आणि ०२ सप्टेंबर २०२६ रोजी प्रत्यक्ष भेट देऊन संशय आल्याने प्रत्येकी ५० रुपयांची देणगी ऑनलाईन पद्धतीने दिली. ही रक्कम संस्थेच्या खात्याऐवजी थेट सहसचिवाच्या बँक ऑफ बडोदा खात्यात खाते क्र. ११९९०१०MDA१३००८ जमा होत असल्याचे उघडकीस आले. देणगीदारांना मात्र संस्थेच्या नावाच्या पावती पुस्तकातील पावत्या देऊन त्यांची पद्धतशीर फसवणूक केली जात होती. विश्वस्तांचाच विश्वासाला तडा आणि नियमांची पायमल्ली सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयातील नियमांनुसार नियम क्र. २२ संस्थेच्या बँक खात्याचे व्यवहार हे अध्यक्ष व सचिव यांच्या संयुक्त स्वाक्षरीने राष्ट्रीयीकृत किंवा अनुसूचित बँकेतून होणे बंधनकारक आहे. असे असतानाही अध्यक्ष मसुदूर रहमान अब्दुल सत्तार फारुकी, सचिव असदूर रहमान मसुदूर रहमान फारुकी आणि सहसचिव अतिकूर रहमान फारुकी यांनी संगनमत करून, स्वतःच्या वैयक्तिक खात्याचे क्यूआर कोड प्रदर्शित केले. संस्थेचे आर्थिक व्यवहार शासनापासून लपवून स्वतःचा वैयक्तिक फायदा लाटल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. प्रकरणाचा तपशील आणि दाखल गुन्हे नांदेड एटीएसच्या फिर्यादीवरून हिंगोली ग्रामीण पोलीस ठाण्यात प्रथम खबर अहवाल एफआयआर क्र. 0696/2026 नोंदवण्यात आला आहे: घटना कालावधी: २६ ऑगस्ट २०२६ ते ०२ सप्टेंबर २०२६ फिर्यादी: रवींद्र ओमप्रकाश धाबे, पोलीस हवालदार, एटीएस नांदेड युनिट आरोपी: १) अतिकूर रहमान मसुदूर रहमान फारुकी – सहसचिव २) मसुदूर रहमान अब्दुल सत्तार फारुकी – अध्यक्ष ३) असदूर रहमान मसुदूर रहमान फारुकी – सचिव दाखल कलमे: भारतीय न्याय संहिता मधील कलम 318-4 फसवणूक, 319-2 तोतयागिरी, 316-2, 316-4 फौजदारीपात्र विश्वासघात, 3-5 समान उद्देश आणि माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० चे कलम 66-D संगणक प्रणालीद्वारे फसवणूक. सदर प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक विष्णुकांत तुकाराम गुट्टे करत आहेत. Kanthak Suryatal Post Views: 14 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation गोदावरी नदीपात्रात पोलिसांची धडक; ५.२७ कोटींचा मुद्देमाल जप्त!