लातूर(प्रतिनिधी)-नांदेड परिक्षेत्रातील अवैध व्यवसायांना पायबंद घालण्यासाठी पोलीस उप महानिरीक्षक शहाजी उमाप यांनी आपल्या कार्यालयातील अधिकारी व अंमलदारांचे एक पोलीस पथक लातूर जिल्हयात रवाना केले होते. सदर पथकाने, दिनांक 11.08.2026 रोजी शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत तिरुपती हॉस्पीटलकडे जाणारे रोडवर राजे बार ॲन्ड रेस्टारंट समोर टीन शेडमध्ये मटका बुक्कीवर कारवाई करत, 12,610/-रुपयांची रोकड व 19,000/- हजार रुपयांचे (3) मोबाईल जप्त केले असून, नमूद प्रकरणात एकूण (6) आरोपीतांना ताब्यात घेवून, त्यांचेविरुध्द शिवाजीनगर पोलीस ठाणे येथे गुरनं 396/2026 कलम 12 (अ) महाराष्ट्र जुगार कायदा अन्वये गुन्हा नोंदवून, त्याचा तपास शिवाजीनगर पोलीस ठाण्यातील पोह निजामोद्दीन शेख यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. त्याचप्रमाणे, पोलीस ठाणे विवेकानंद चौक हद्दीत एम आय टी कॉलेज ते नवीन रेणापूर नाका येथे योगेश बनसोडे यांचे जागेतील पत्र्याचे शेडमध्ये कल्याण नावाच्या मटका बुक्कीवर कारवाई करत, 19,350/-रुपयांची रोकड व 42 हजार रुपयांचे (5) मोबाईल जप्त केले असून, नमूद प्रकरणात एकूण (9) आरोपीतांना ताब्यात घेवून, त्यांचेविरुध्द विवेकानंद चौक पोलीस ठाणे येथे गुरनं 577/2026 कलम 4,5 महाराष्ट्र जुगार कायदा अन्वये गुन्हा नोंदवून, त्याचा तपास विवेकानंद चौक पोलीस ठाण्यातील पोह सुनिल हराळे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. त्यांनतर, पथकाने अहमदपुर पोलीस ठाण्याच्या हद्दीत बनसोडे यांच्या शेतातील टीन शेडच्या बाजूस जुगार खेळणाऱ्यांविरुद्ध कारवाई करत, 37,320/-रुपयांची रोकड, (12) मोबाईल, (2) चारचाकी व (5) मोटार सायकली असा एकूण 16,91,720/- रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून, नमूद प्रकरणात एकूण (12) इसमांना ताब्यात घेवून, त्यांचेविरुध्द अहमदपुर पोलीस ठाणे येथे गुरनं 540/2026 कलम 12 (अ) महाराष्ट्र जुगार कायद्याअन्वये नोंदवून, त्याचा तपास अहमदपुर पोलीस ठाण्यातील पोउपनि श्रीमंगल यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. उपरोक्त तिन्ही कारवायांत, एकूण (27) आरोपींकडून 69,280/- रुपयांची रोकड, (20) मोबाईल व साहित्य असा एकूण 17,84,680/- रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सदर कारवाईत पोलीस उपनिरीक्षक पंकज इंगळे यांचेसह पोहेकॉ/ प्रदिप खानसोळे, पोहेकॉ/ गणेश राठोड, पोहेकॉ/ संदिप वाघाडे व पोहेकॉ/ गजानन डवरे यांनी सहभाग घेतला. पथकाच्या उल्लेखनीय कामगिरीबाबत पोलीस उप महानिरीक्षक श्री शहाजी उमाप यांनी पथकातील अधिकारी व अंमलदारांचे अभिनंदन करून त्यांना प्रोत्साहित केले आहे. ‘ खबर ‘ हेल्पलाइन वरुन माहिती द्या : अवैध व्यवसायांची माहिती थेट पोलीसांना पोहोचविता यावी, या दृष्टिकोनातून, पोलीस उप महानिरीक्षक कार्यालयाने 91 50 100 100 हा मोबाईल क्रमांक असलेली ‘खबर’ नावाची हेल्पलाइन सुरू केली असून, सदर हेल्पलाइन वरून नागरिकांनी आपल्या भागातील अवैध व्यवसायांची माहिती पोलीस उप महानिरीक्षक कार्यालयापर्यंत पोहचवावी, असे आवाहन नांदेड परिक्षेत्राचे पोलीस उप महानिरीक्षक श्री. शहाजी उमाप यांनी केले आहे. Kanthak Suryatal Post Views: 802 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation संसदेचा पेच आणि पॅलेट गनचे सत्य: शाहंचा मास्टरस्ट्रोक की केवळ राजकीय खेळी? पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांचा लातूरमधील तक्रारदारांशी ‘संवाद’