तंत्रज्ञानाची चोरी की युद्धाची रणनीती? इराणकडे सध्या अमेरिकन आणि इस्रायली बनावटीचे ड्रोन्स उपलब्ध आहेत, ज्यांच्या भागांचा अभ्यास इराणचे इंजिनिअर्स करत आहेत. इराण स्वतःची शस्त्रे आणि ड्रोन्स स्वतः तयार करतो, त्यासाठी त्यांना कोणत्याही आयातीवर अवलंबून राहावे लागत नाही. आता जगातील सर्वात प्रगत मानल्या जाणाऱ्या अमेरिकन तंत्रज्ञानाचा अभ्यास करून इराण त्यापेक्षाही सरस ड्रोन यंत्रणा बनवण्याच्या तयारीत आहे. यापूर्वीही इराणने आपल्या शाहीद ड्रोनची नवीन आवृत्ती अमेरिकन तळांवर हल्ल्यांसाठी वापरली होती, ज्यामुळे बहरीन आणि कुवेतमध्ये अमेरिकन सैन्याचे मोठे नुकसान झाले होते.
विदेशी सैन्याला बाहेर पडण्याचा अल्टिमेटम इराणच्या सर्वोच्च नेत्याचे वरिष्ठ सल्लागार अली अकबर विलायती यांनी स्पष्टपणे इशारा दिला आहे की, या प्रदेशात शांतता प्रस्थापित करण्यासाठी विदेशी सैन्याने येथून निघून जावे. विलायती यांच्या मते, मध्यपूर्वेतील असुरक्षिततेचे मुख्य कारण या बाह्य शक्तींची उपस्थितीच आहे. सध्याची परिस्थिती पाहता, जॉर्डन, बहरीन आणि कुवेत यांसारख्या ठिकाणांहून अमेरिकन सैन्याने माघार घेण्यास सुरुवात केली आहे, कारण तिथे त्यांना स्थानिक जनतेचा विरोध आणि इराणचे थेट हल्ले सहन करावे लागत आहेत. जॉर्डनमधील अमेरिकन एअरबेसवर झालेल्या हल्ल्यांमध्ये काही सैनिक जखमी झाल्याची आणि काहींचा मृत्यू झाल्याचीही माहिती समोर आली आहे.

अमेरिकन लष्कराची हतबलता आणि शस्त्रास्त्रांची कमतरता सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, अमेरिकेचे सर्वोच्च जनरल सी.क्यू. ब्राऊन (डॅन केन) यांनी खासगीत ट्रम्प प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना या युद्धातून बाहेर पडण्याचा मार्ग शोधण्याचा सल्ला दिला आहे. त्यांच्या मते, केवळ हवाई शक्तीच्या जोरावर इराणविरुद्धचे उद्दिष्ट साध्य करणे अशक्य आहे. अमेरिकेची दुसरी मोठी अडचण म्हणजे त्यांचा मिसाईल स्टॉक झपाट्याने कमी होत आहे. उदाहरणार्थ, अमेरिकेला पेट्रियट मिसाईलचे इंटरसेप्टर्स पुरवणारी लॉकहीड मार्टिन कंपनी वर्षाला जेमतेम 640 इंटरसेप्टर्स बनवते, तर अमेरिकेने यातील अर्ध्याहून अधिक साठा आधीच वापरला आहे. इराण जेव्हा एकाच वेळी 10-20 क्षेपणास्त्रांचा मारा करतो, तेव्हा अमेरिकेला ते रोखणे कठीण होत आहे.
इराणची ४० वर्षांची दीर्घकालीन रणनीती इराण गेल्या 40 वर्षांपासून या युद्धाची तयारी करत आहे. त्यांची रणनीती अमेरिकेला थेट युद्धात हरवण्याऐवजी, त्यांना थकवण्यावर आधारित आहे. इराणकडे क्षेपणास्त्रे आणि ड्रोन्सचे उत्पादन करण्याची क्षमता प्रचंड असून, त्यांचा साठा दीर्घकाळ चालू शकतो. याउलट, अमेरिकेला आपल्या शस्त्रास्त्रांचा साठा पुन्हा भरण्यासाठी मोठा वेळ हवा आहे. इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराक्ची यांनी म्हटले आहे की, इराणने जगातील सर्वात महागड्या सैन्यासमोर आपली ताकद सिद्ध केली असून, आता मुस्लिम देशांनी एकत्र येऊन बाह्य शक्तींना बाहेर काढण्याची वेळ आली आहे.
#MuslimUnity #AbbasAraghchi #RegionalPower
