पोलिसांना गुप्त बातमीदारामार्फत झुलेलाल मंदिराजवळ खोली क्रमांक ३०९ मध्ये काही जण पैशांवर तिरट जुगार खेळत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार गुन्हे शोध पथकाने पंचांसह घटनास्थळी छापा टाकला असता पाच जण जुगार खेळताना आढळून आले. पोलिसांनी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून आरोपींकडून रोख रक्कम, बदक छाप पत्ते, पाच मोबाईल फोन आणि चार दुचाकी वाहने जप्त केली. या प्रकरणी वजीराबाद पोलीस ठाण्यात जुगारी रवी पेगाजी गवळे (४१),
विकास रामराव सरपोत (३५),अतुल भगवानराव वाडे (३५) रा. गुरुवार बाजार सिडको नांदेड,मुकेश पांडुरंग लोलगे (३६) रा. भोजलाल गवळी चौक नांदेड,चंद्रशेखर गणपतराव पवार (३३) रा . सिडको नांदेड या पाच जणांविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियमाच्या कलम 4 व 5 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप अधीक्षक रामेश्वर व्येंजने,पोलीस निरीक्षक अजित कुंभार, सहायक पोलीस निरीक्षक लोढे, पोलीस उप निरीक्षक सुनील बुलंगे व गुन्हे शोध पथकातील पोलीस अंमलदार गणेश धुमाळ,विलास कदम,ज्वालासिंग बावरी,किशोर जयस्वाल,संतोष पोकळे यांनी केली. तसेच जिल्हा पोलिसांनी नागरिकांना परिसरात अवैध जुगार, मटका अथवा तत्सम बेकायदेशीर प्रकार सुरू असल्यास तात्काळ पोलिसांना माहिती देण्याचे आवाहन केले आहे.
