नांदेड (प्रतिनिधी)- आसना नदीवरील पुलाजवळ झालेल्या खूनप्रकरणातील दोन फरार आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. 11 जुलै रोजी आसना नदीवरील पुलाखाली सचिन काळे यांचा मृतदेह आढळून आला होता. याप्रकरणी विमानतळ पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन आरोपींचा शोध घेण्याचे आदेश स्थानिक गुन्हे शाखेला देण्यात आले होते. शनिवार, 26 जुलै रोजी गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी शंकरराव चव्हाण चौकाजवळ सापळा रचून अनिल शंकर वाघमारे (वय 24, रा. माळजानगर, नांदेड) व प्रज्ज्वल उर्फ बारक्या उत्तम गोवंदे (वय 20, रा. त्रिरत्ननगर, सांगवी बुद्रुक, नांदेड) यांना ताब्यात घेतले. प्राथमिक चौकशीत दोघांनीही खूनप्रकरणातील सहभागाची कबुली दिली असून पुढील कायदेशीर कारवाईसाठी त्यांना विमानतळ पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक अतुल भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक रवी वाहुळे व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली. Kanthak Suryatal Post Views: 1,227 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation नांदेडचा जादूई ताडी / सिंदी उद्योग: एफडीएचे नियम धाब्यावर, २४ तासांत पुन्हा दुकान सुरू! नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळ निवडणुकीत 95.54 टक्के मतदान