नांदेड (प्रतिनिधी)- वजीराबाद पोलिस ठाण्याच्या हद्दीतील अबचलनगर परिसरातील साहेबजादा फत्तेसिंग मंगल कार्यालयात अल्पवयीन मुलगा-मुलीचा विवाह लावल्याप्रकरणी सहा जणांविरुद्ध बालविवाह प्रतिबंधक अधिनियम २००६ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ९ जून ते २० जून २०२६ या कालावधीत संबंधित विवाह सोहळा पार पडला. याप्रकरणी रंजीतसिंघ हरीसिंघ सिल्लेदार, प्रितपाल कौर रंजीतसिंघ सिल्लेदार, परमज्योतसिंघ जितसिंघ सिल्लेदार, प्रेमज्योतसिंग हरीसिंघ सिल्लेदार, हरदीपसिंघ शेरसिंघ सिल्लेदारआणि मनीधरसिंघ इंदरसिंघगाडीवाले (सर्व रा. नांदेड) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारीनुसार, फिर्यादी यांच्या २० वर्षीय मुलीचा विवाह २१ वर्षांपेक्षा कमी वयाच्या तरुणाशी लावण्यात आला. मुलाचे वय कायदेशीर मर्यादेपेक्षा कमी असल्याची माहिती असूनही संबंधितांनी संगनमत करून विवाह लावल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी फिर्यादी राजेंद्रसिंघ सुंदरसिंघ शाहू (वय ४८, रा. बडपुरा, नांदेड) यांच्या तक्रारीवरून वजीराबाद पोलिस ठाण्यात गुन्हा क्रमांक ३७०/२०२६ नोंद करण्यात आला आहे. आरोपींविरुद्ध बालविवाह प्रतिबंधक अधिनियम, २००६ मधील कलम ९, १० आणि ११ अन्वये कारवाई करण्यात आली असून पुढील तपास वजीराबाद पोलिस करीत आहे Kanthak Suryatal Post Views: 768 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation अवैध वाळू वाहतुकीवर वजिराबाद पोलिसांची धडक कारवाई; दोन टेम्पो जप्त, ₹7.07 लाखांचा मुद्देमाल हस्तगत तरोडा नाका, भावसार चौक परिसरात सार्वजनिक शौचालयाची मागणी लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षामुळे व्यापारी आणि नागरिक त्रस्त