नांदेड- तालुक्यातील खुरगाव नांदुसा परिसरातील ऋषिपठण बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने आज १४ जुलै रोजी श्रामणेर प्रशिक्षण केंद्रात एकदिवसीय सत्य अन्वेषण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात ध्यान साधना, शील संवर्धन आणि सदाचार, सत्य शोध प्रशिक्षण कार्यक्रम होणार असून नागपूर येथील जागतिक कीर्तीचे विपश्यनाचार्य पूज्य भदंत विनयरक्खित महाथेरो यांचे प्रेरणादायी मार्गदर्शन लाभणार आहे. यावेळी खुरगाव नांदुसा येथील भिख्खू संघ आणि हिंगोली बीड येथील पुज्य भिक्खू धम्मशील थेरो यांची उपस्थिती राहणार आहे, अशी माहिती मुख्य संयोजक तथा अखिल भारतीय भिख्खू संघाचे जिल्हाध्यक्ष संघनायक धम्मगुरु भदंत पंय्याबोधी थेरो यांनी दिली. धावपळीच्या आणि ताणतणावाच्या आजच्या युगात मनाला खरी शांतता, स्थिरता आणि जीवनाचा खरा आनंद मिळवून देणारा सुवर्णयोग म्हणजे आजचा हा कार्यक्रम आहे. आपण कोण आहोत आणि जीवनाचे अंतिम सत्य काय आहे, याचा सखोल शोध घेण्यासाठी आज दि. १४ जुलै रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत सत्य अन्वेषण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. शिबिरपूर्व नावनोंदणी आवश्यक असून शुभ्र वस्त्र परिधान करून आणि स्वतःसाठी एक डायरी व पेन घेऊन दिवसभर थांबण्याच्या तयारीने यावे. सर्वांसाठी चहा नाश्त्याची सोय करण्यात आली आहे. २० आणि त्यापुढील वयोगटातील महिला पुरुषांनी मोठ्या संख्येने शिबिरात उपस्थित राहण्याचे आवाहन भदंत पंय्याबोधी थेरो यांनी केले आहे Kanthak Suryatal Post Views: 324 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation तख्त सचखंड श्री हुजूर साहिब गुरुद्वारात राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी घेतले दर्शन नांदेड बस स्थानकावर थरार: पोलिसांसमोरच १७ वर्षीय मुलाची निर्घृण हत्या