नांदेड (प्रतिनिधी) – शहरातील चौफाळ येथील शनिदेव गल्ली परिसरात जुन्या वादातून एका १९ वर्षीय तरुणावर जीवघेणा हल्ला करून त्याच्या खुनाचा प्रयत्न केल्याची घटना ३ जुलै रोजी सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास घडली. या प्रकरणी दोघांविरुद्ध इतवारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, शंकर किशन जिंदम उर्फ चिंग्या आणि मारोती गुंडेवार (दोघेही रा. शनिदेव गल्ली, चौफाळ, नांदेड) यांनी संगनमत करून जुन्या वादाच्या कारणावरून दुर्गेश गुरुप्रसाद चलिन्दरवार (वय १९) याच्यावर जीव घेण्याच्या उद्देशाने गळ्यावर गंभीर वार करून त्याला गंभीर दुखापत केली. या हल्ल्यात दुर्गेश जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेप्रकरणी जखमी दुर्गेश गुरुप्रसाद चलिन्दरवार र यांच्या फिर्यादीवरून इतवारा पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक २३१/२०२६ अंतर्गत भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १०९(१), ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गवळी करीत आहेत. आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलीस पथक कार्यरत असून पुढील तपास सुरू आहे. Kanthak Suryatal Post Views: 1,724 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation नांदेड जिल्ह्यात चोरी आणि घरफोडीच्या सलग घटना; तीन गुन्हे दाखल इस्लापूर पोलिसांची धडक कारवाई; १.३५ लाखांचा प्रतिबंधित गुटखा जप्त