नांदेड (प्रतिनिधी)- धन-धन श्री गुरु हरगोबिंद साहिब जी यांच्या पवित्र प्रकाश पर्वानिमित्त मंगळवार, दि. ३० जून २०२६ रोजी सकाळी ११ वाजता बाबा फतेह सिंग जी मंगल कार्यालयातर्फे विशेष धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या दिवशी सुरू असलेल्या साप्ताहिक श्री गुरुग्रंथ साहिब जी यांच्या पवित्र पठणाची भक्तिमय वातावरणात सांगता होणार असून, त्यानंतर अखंड गुरू का लंगर सर्व संगत व भाविकांसाठी आयोजित करण्यात आला आहे. या पवित्र सोहळ्यास तख्त सचखंड श्री हजूर साहिब, नांदेड येथील जथेदार संत बाबा कुलवंत सिंघ जी यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. तसेच तख्त सचखंड श्री हजूर साहिबचे आदरणीय पंच प्यारे साहिबान, संत बाबा तेजा सिंघ जी (जथेदार, गुरुद्वारा माता साहिब जी), संत बाबा बलविंदर सिंघ जी (कार सेवा, गुरुद्वारा लंगर साहिब जी) तसेच महाकाल ज्ञानी शेर सिंघ जी (अंबाळेवाले) यांचीही विशेष उपस्थिती राहणार आहे. प्रकाश पर्वानिमित्त होणाऱ्या या धार्मिक सोहळ्यात गुरुवाणीचे कीर्तन, अरदास, साप्ताहिक पठणाची समाप्ती आणि त्यानंतर अखंड गुरु लंगरचे आयोजन करण्यात आले आहे. या पवित्र कार्यक्रमाचा लाभ घेण्यासाठी सर्व संगत, श्रद्धाळू व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून गुरु घराचा आशीर्वाद घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. हजुरी क्रांती संघटनेच्या वतीने सर्व भाविकांना या पवित्र सोहळ्यात सहभागी होण्याचे निमंत्रण देण्यात आले असून, वाहेगुरु जी का खालसा, वाहेगुरु जी की फतेह या पवित्र संदेशासह गुरु साहिबांच्या प्रकाश पर्वाचा आनंद संगतने एकत्रितपणे साजरा करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. Kanthak Suryatal Post Views: 491 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation माजी नगरसेवक नरसिंगराव पावडे यांचे निधन’ऍड. निलेश पावडे यांना पितृयोग नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या २३ जागांसाठी ८६ जणांचे अर्ज दाखल