नांदेड (प्रतिनिधी) – नांदेड जिल्ह्यात अवैधरित्या गोवंशीय जनावरांची वाहतूक करणाऱ्या टोळीवर स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत 19 गोवंशीय जनावरे, एक आयशर वाहन आणि एकूण 22 लाख 60 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी चार आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्याविरुद्ध नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, गाडेगाव रोडवरील मलशुद्धीकरण केंद्रासमोरील परिसरात तसेच एका शेडमध्ये गोवंशीय जनावरे कत्तलीच्या उद्देशाने आणण्यात येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार 26 जून रोजी सकाळी सुमारे 8.45 वाजता छापा टाकण्यात आला. यावेळी आयशर वाहन (एमएच-26-बीई-4946) मध्ये 10 बैलांची अवैध वाहतूक सुरू असल्याचे आढळून आले. तसेच मोहम्मद सादिक अब्दुल गफूर यांच्या शेडमध्ये 8 बैल व 1 गाय कत्तलीच्या उद्देशाने बांधून ठेवलेली आढळली. या कारवाईत 11 लाख रुपयांचे आयशर वाहन व 11.60 लाख रुपयांची 19 गोवंशीय जनावरे असा एकूण 22.60 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी झबोउल्लाखान झहीरउल्लाखान, शेख कलीम उर्फ कल्यू शेख अहमद, मोहम्मद सादिक अब्दुल गफूर आणि मोहम्मद रिजवान मोहम्मद जाफर या चौघांविरुद्ध महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम, प्राण्यांचा छळ प्रतिबंध अधिनियम तसेच भारतीय न्याय संहितेतील संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस उपनिरीक्षक नागनाथ तुकडे, पोलीस उपनिरीक्षक मिलिंद सोनकांबळे व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली. उत्कृष्ट कामगिरीबद्दल पोलीस अधीक्षकांनी संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले. Kanthak Suryatal Post Views: 1,069 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation नांदेड पोलीस अधीक्षक कार्यालयात राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती उत्साहात साजरी महाराष्ट्र पोलीस दलात मोठे फेरबदल: २७ पोलीस उप अधीक्षकांना नियुक्त्या बदलून नवीन नियुक्त्या