नांदेड (प्रतिनिधी) – परदेश पर्यटनासाठी नेण्याचे आमिष दाखवून एका ज्येष्ठ नागरिकाची तब्बल १ लाख ७ हजार १०० रुपयांची फसवणूक झाल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी विमानतळ पोलीस ठाण्यात दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, केशवे नगर, हनुमानगड येथील रहिवासी अच्युत भीमराव कोमवाड (वय ७५) यांना आरोपी तनय चिट्टे व जयदीप श्रीरंग काशीकर यांनी भारतवत पर्यटन सेवा या टूर कंपनीचे एजंट असल्याचे भासविले. फिर्यादी व त्यांच्या मित्रास परदेश दौऱ्यावर घेऊन जाण्याचे आश्वासन देत दोघांनी संगनमताने १ लाख ७ हजार १०० रुपये स्वीकारले. मात्र, ठरल्याप्रमाणे कोणतीही पर्यटन सेवा न देता संबंधित रक्कम हडप केल्याचा आरोप करण्यात आला आहे. ही घटना १९ जानेवारी २०२६ ते ३१ मार्च २०२६ दरम्यान घडल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. याप्रकरणी अच्युत कोमवाड यांच्या तक्रारीवरून विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक २९७/२०२६ नोंद करण्यात आला असून आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३१६(२), ३१६(५), ३१८(४) व ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक साखरे करीत आहेत. Kanthak Suryatal Post Views: 621 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation नांदेडमध्ये दोन घरफोड्या; २.०५ लाखांचा ऐवज लंपास मोसादचा डाव फसला! आसिम मुनीर यांच्या हत्येचा प्रयत्न आणि ट्रम्प यांचा नेतन्याहूंना इशारा