धम्म प्रचारासाठी खुरगावला आवश्यक मुलभूत सुविधा नांदेड (प्रतिनिधी)- तालुक्यातील खुरगाव नांदुसा परिसरातील श्रामणेर प्रशिक्षण केंद्रात विकसित होत असलेली श्रामणेर दीक्षाभूमीला बौद्ध धम्म चळवळीत अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले असून येथे भिक्खू संघाच्या निवासाची कायमस्वरूपी व्यवस्था, ध्यान साधनेसाठी आवश्यक सभागृह, ग्रंथालय, भोजनाची व्यवस्था, रम्य निसर्ग परिसर यांमुळे श्रामणेर प्रशिक्षण केंद्राच्या माध्यमातून भदंत पंय्याबोधी यांची दूरदृष्टी दिसून येते. धम्म प्रचारासाठी खुरगावला आवश्यक सुविधा आपल्या सर्वांच्या दानातून मिळालेल्या आहेत. त्या अधिकाधिक विकसित व्हायला हवे असे प्रतिपादन वंचित बहुजन आघाडीच्या राष्ट्रीय नेत्या अंजलीताई आंबेडकर यांची केले. त्यांनी श्रामणेर प्रशिक्षण केंद्राला सदिच्छा भेट दिली. त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी भिख्खू संघासह मनपा गटनेते इंजि. प्रशांत इंगोले, श्याम कांबळे, उपप्राचार्य साहेबराव इंगोले आदींची उपस्थिती होती. श्रामणेर प्रशिक्षण केंद्रात धम्म चळवळीस पोषक असे विविध उपक्रम राबविले जातात. शहरात संपन्न होणाऱ्या २१ व्या आंबेडकरवादी साहित्य संमेलनास प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहण्यासाठी अंजलीताई आंबेडकर आल्या होत्या. त्यांनी श्रामणेर प्रशिक्षण केंद्रास भेट देऊन पाहणी केली. यानिमित्ताने बोधीवृक्षास जलसिंचन करून बोधीपुजा करण्यात आली. तसेच श्रामणेर प्रशिक्षण केंद्राच्या वतीने अंजलीताई आंबेडकर यांचा भव्य सत्कार करण्यात आला. त्यानंतर उपस्थित बौद्ध उपासक उपासिका यांच्याशी हृद्य संवाद साधला. श्रामणेर दीक्षाभूमीचे काम पूर्ण झाल्यानंतर वंचितचे सर्वेसर्वा राष्ट्रीय अध्यक्ष ज्येष्ठ विधिज्ञ ऍड. बाळासाहेब आंबेडकर यांच्यासोबत उद्घाटनासाठी उपस्थित राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी भदंत पंय्याबोधी थेरो यांच्यासह शहरातील अनेक मान्यवरांची उपस्थिती होती. Kanthak Suryatal Post Views: 670 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation एकाच फोटोवर खटला, दुसऱ्यावर शांतता का?– पत्रकारांचे पोलीस निरीक्षकांकडे दुर्लक्ष आणि सहायक पोलीस निरीक्षकांवर लक्ष रुग्णांच्या हतबलतेवर डल्ला मारणारी रुग्णालयांची दुकानदारी आता बंद! तुकाराम मुंढेंचा खासगी रुग्णालयांना थेट इशारा