नांदेड (प्रतिनिधी)- गाडी क्रमांक १७६४२ (नरखेड–काचेगुडा इंटरसिटी एक्सप्रेस) मध्ये आग लावण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीला अटक करण्यात आरपीएफ नांदेडला यश आले आहे. अवघ्या १५ दिवसांत या प्रकरणाचा उलगडा करून रेल्वे सुरक्षा बलाने (RPF) मंगेश जाधव (वय २९, रा. जि. वाशीम) या आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. नेमकी घटना काय? दिनांक २७ मे २०२६ रोजी ही ट्रेन हिंगोली रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक १ वर आली असता, कोच क्रमांक SC-259288 (D-5) च्या शौचालयातून धूर येत असल्याचे दिसले. आरपीएफचे कॉन्स्टेबल व्ही. एम. शिंदे यांनी दाखवलेल्या सतर्कतेमुळे आणि तत्परतेने अग्निशामक यंत्राचा वापर केल्यामुळे ही आग वेळीच विझवण्यात आली, ज्यामुळे एक मोठा अनर्थ टळला. तपास आणि अटक: या घटनेचे गांभीर्य ओळखून वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त (RPF, नांदेड) दीप चंद्र आर्य यांच्या मार्गदर्शनाखाली १ जून २०२६ रोजी एका विशेष तपास पथकाची स्थापना करण्यात आली होती. पथकाने विविध रेल्वे स्थानकांवरील सीसीटीव्ही फुटेज, फॉरेन्सिक पुरावे, तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त माहितीच्या आधारे तपास चक्र फिरवले. अखेर ११ जून २०२६ रोजी मंगेश जाधव याला ताब्यात घेण्यात आले. तपासादरम्यान त्याचे या आगीच्या घटनेशी थेट संबंध असल्याचे ठोस पुरावे हाती लागले आहेत. आरोपीला पूर्णा येथील न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्याला १५ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. आरपीएफची रेल्वे प्रवासी आणि मालमत्तेच्या सुरक्षेसाठी आरपीएफ कटिबद्ध असल्याचे या यशस्वी कारवाईतून पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. आरपीएफच्या या व्यावसायिक कौशल्य आणि समन्वित कार्यपद्धतीचे सर्वत्र कौतुक होत आहे. Kanthak Suryatal Post Views: 1,065 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation जागतिक बालकामगार विरोधी दिनानिमित्त जनजागृती रॅली ; दोन अल्पवयीन मुलांची सुटका खून व दरोड्याच्या गुन्ह्यातील फरार आरोपीला अटक