मुखेड (प्रतिनिधी) – तालुक्यातील जुन्या मोंढा परिसरात अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून तब्बल 1 लाख 89 हजार 521 रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी भगवान गोविंदराव कापसे (वय 55, रा. जुना मोंढा, मुखेड) हे घर बंद करून बाहेर गेले असताना 15 मे 2026 रोजी सायंकाळी 6 ते 25 मे 2026 रोजी सकाळी 8 वाजेदरम्यान ही चोरी झाली. आरोपी सुरेश जीवन खेडकर उर्फ छोट्या (रा. राजानगर, नांदेड) तसेच एका विधिसंघर्षग्रस्त बालकाने संगनमत करून घराच्या कडी-कोयंड्याचे कुलूप तोडत घरात प्रवेश केला. यानंतर घरातील कपाटात ठेवलेले सोन्या-चांदीचे दागिने चोरून नेण्यात आले. या प्रकरणी भगवान कापसे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मुखेड पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 151/2026 नोंद करण्यात आला आहे. आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) 2023 च्या कलम 305, 331(3) व 4 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सपोनि शेख करीत आहेत. Kanthak Suryatal Post Views: 818 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation अवैद्य स्विमिंग पूल चालकाविरुद्ध बालकाच्या मृत्यू प्रकरणी गुन्हा दाखल अवैध वाळू उपशावर पोलिसांचा मोठा छापा; 76.50 लाखांचा मुद्देमाल जप्त