किनवट (प्रतिनिधी)- तालुक्यातील इस्लामपुरा परिसरात एका १४ वर्षीय मुलाचा स्विमिंग पूलमध्ये बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली असून, याप्रकरणी स्विमिंग पूल चालकाविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २८ मे २०२६ रोजी दुपारी साडे दोन वाजण्याच्या सुमारास इस्लामपुरा परिसरातील स्विमिंग पूलमध्ये झानेश्वर गजानन चंदे (वय १४, रा. एस.टी. वसाहत, किनवट) हा मुलगा पोहणे शिकण्यासाठी गेला होता. संबंधित स्विमिंग पूल चालकाने कोणतीही अधिकृत परवानगी न घेता तसेच आवश्यक सुरक्षा सुविधा उपलब्ध न ठेवता पूल सुरू केला होता, असा आरोप करण्यात आला आहे. यावेळी फिर्यादीचा मुलगा पाण्यात उतरला असता त्याच्याकडे दुर्लक्ष झाल्याने तो पाण्यात बुडाला आणि त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी नागनाथ शेषेराव चंदे (वय ३६, रा. सावरी, ता. किनवट) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून किनवट पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक १२३/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम १०५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक झाडे हे करीत आहेत. Kanthak Suryatal Post Views: 1,158 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation अर्धापूर येथे जबरी चोरी; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल साहेबराव गुट्टे नांदेडचे पोलीस उप अधीक्षक मुख्यालय