गडचिरोली, मुंबई शहर, नागपूर शहर, नवी मुंबई, रायगड, एमबीव्हीव्ही, एएनटीएफ आदी ठिकाणी कार्यरत असलेल्या अधिकाऱ्यांची पुणे शहर, नागपूर परिक्षेत्र, नाशिक, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, पिंपरी-चिंचवड तसेच इतर ठिकाणी नियुक्ती करण्यात आली आहे.
बदली आदेशांमध्ये काही अधिकाऱ्यांना एक वर्ष मुदतवाढ देण्यात आली असून काहींना विशेष विनंती बदल्यांचाही लाभ देण्यात आला आहे. पोलीस विभागातील प्रशासकीय कार्यक्षमता वाढविणे आणि मनुष्यबळाचे संतुलन राखणे हा या बदल्यांमागील उद्देश असल्याचे सूत्रांनी सांगितले. दरम्यान, या आदेशामुळे अनेक जिल्ह्यांतील पोलीस यंत्रणेत नव्या जबाबदाऱ्यांचे वाटप होणार असून स्थानिक पातळीवरही त्याचे परिणाम दिसून येणार आहेत.या बदली आदेशावर पोलीस महासंचालक कार्यालयातील आस्थापना विभागाच्या विशेष पोलीस महानिरीक्षक सुप्रिया पाटील यांची स्वाक्षरी आहे.
वाचकांच्या सोयीसाठी बदली आदेश जोडले आहेत. .
