नांदेड (प्रतिनिधी)-रांजणोली ता.भिवंडी जि.ठाणे येथे नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र राज्य शासकीय पाणीपुरवठा कंत्राटदार संघटनेच्या राज्यस्तरीय महाअधिवेशनात नांदेडचे जिल्हाध्यक्ष संदीप उदगीरकर यांची मराठवाड्यातून राज्य कार्यकारिणीवर संचालक म्हणून निवड झाली आहे. रांजणोली ता.भिवंडी जि.ठाणे येथे महाराष्ट्र राज्य शासकीय पाणीपुरवठा कंत्राटदार संघटनेचे राज्यस्तरीय अधिवेशन नुकतेच पार पडले. या अधिवेशनात राज्य कार्यकारिणी निवडण्यात आली असून, त्यात अध्यक्ष पदाची माळ नाशिकच्या बाळासाहेब जाधव यांच्या गळ्यात पडली असून, त्यांची एकमताने निवड झाली. तर संचालक म्हणून नांदेडचे जिल्हाध्यक्ष संदीप उदगीरकर यांची मराठवाड्यातून निवड झाली आहे. याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. या बैठकीत झालेल्या ठरावाची माहिती देताना संदीप उदगीरकर यांनी सामनाशी बोलताना सांगितले जलजीवन मिशनअंतर्गत पाणीपुरवठा योजनेची प्रलंबित देयके तातडीने अदा करण्यात यावी, तसे न झाल्यास कामबंद आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. त्यासोबत केंद्र व राज्य सरकारकडून मिळणारा निधी केंद्राच्या स्पर्श प्रणालीस सुरु होण्यास विलंब होत असल्यामुळे प्रलंबित देयकांचा निधी जुन्या प्रणालीव्दारे देण्यात यावा, निधीअभावी कंत्राटदाराची बँकांची देणी संपल्यामुळे शासन स्तरावरुन बँकांना मागणीचा तगादा न लावण्याच्या सूचना त्यांनी द्याव्यात, त्याचप्रमाणे निधी नसल्यामुळे जीएसटी परतावा भरण्यास उशिर होत असल्यामुळे कंत्राटदारावर दंडात्मक कारवाई न करण्याबाबत शासनस्तरावरुन जीएसटी विभागास सूचना देण्यात याव्यात, आदी ठराव या बैठकीत मंजूर करण्यात आल्याचे उदगीरकर यांनी सांगितले. यापुढेही शासकीय पाणीपुरवठा कंत्राटदार संघटनेच्या कुठल्याही सदस्यावर अन्याय झाल्यास त्याला संघटीतपणे न्याय देण्याचा आपण प्रयत्न करणार असल्याचे संदीप उदगीरकर यांनी सांगितले. Kanthak Suryatal Post Views: 509 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation इस्रायलला जगाच्या नकाशावरून मिटवण्याची वेळ आली आहे – मोजतबा अली खामेनाई राज्यात PSI बदल्यांचा मोठा निर्णय; 491 हून अधिक अधिकाऱ्यांच्या बदल्या