नांदेड (प्रतिनिधी)- मुदखेड तालुक्यातील बारड येथे एका महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र अज्ञात चोरट्याने लंपास केल्याची घटना घडली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. २४ मे २०२६ रोजी दुपारी सुमारे १२ वाजण्याच्या सुमारास बारड येथे फिर्यादी अनिता शामराव कानवटे (वय ४५, रा. सैनिक कॉलनी, नांदेड) यांच्या गळ्यातील अंदाजे ४९ हजार ५०० रुपयांचे सोन्याचे मंगळसूत्र अज्ञात चोरट्याने चोरून नेले. या प्रकरणी बारड पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ५५/२०२६ दाखल करण्यात आला असून भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ३०३(२) नुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस अंमलदार भाडेकर हे करीत आहेत. Kanthak Suryatal Post Views: 825 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation हिमायतनगर पोलिसांची कारवाई;१३ गोवंशीय जनावरांची सुटका; २.०५ लाखांचा मुद्देमाल जप्त खाकीचा माज की कायद्याची लाज? दुसऱ्या जिल्ह्यातील पोलिसाची नांदेडमध्ये दादागिरी; अर्धापुरात महिलेला मारहाण, विनयभंग