कॅनरा बँकेच्या प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेतून वारसास दोन लाखांची मदत

नांदेड –  येथील कॅनरा बँकेच्या नरसी-नायगाव शाखेमार्फत प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना (पीएमजेजेबीवाय) अंतर्गत खातेदाराच्या वारसास दोन लाख रुपयांची विमा मदत प्रदान करण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित खातेदाराने कॅनरा बँकेतील बचत खात्याद्वारे प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेचा लाभ घेत विमा संरक्षण घेतले होते. दरम्यान, हृदयविकाराच्या झटक्याने खातेदाराचे निधन झाले. त्यानंतर बँकेच्या माध्यमातून आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून वारसदारांना विमा दाव्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. या योजनेअंतर्गत वारसदारांना दोन लाख रुपयांची विमा रक्कम मंजूर करण्यात आली असून, संबंधित वारसदारांच्या खात्यात ही रक्कम जमा करण्यात आली. यावेळी वारसदारांना बँक पासबुक तसेच प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेचे प्रमाणपत्र देण्यात आले. या प्रसंगी शाखा व्यवस्थापक गंगाधर जाधव, बँक अधिकारी अमोल सोनकांबळे, मीरा हुंबड, शुभांगी डोईफोडे, भगवान भोसले, नागेश खेळकर आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!