गोदावरी नदी पात्रातून अवैध रेती उपसा; ४९ लाख २५ हजारांचा मुद्देमाल जप्त

नवीन नांदेड (प्रतिनिधी)- नांदेड ग्रामीण पोलिसांनी  मोठी कारवाई करत गोदावरी नदी पात्रातून अवैधरित्या रेती उपसा करून चोरीची विक्री करणाऱ्या इसमावर गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईत तब्बल ४९ लाख २५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २२ मे २०२६ रोजी पहाटे मार्कंडेश्वर शिवारातील गोदावरी नदी किनाऱ्यावर रेतीचा अवैध उपसा सुरू असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानुसार नांदेड ग्रामीण पोलिसांच्या पथकाने घटनास्थळी छापा टाकला. यावेळी आरोपी पोलिसांना पाहून पसार झाले. कारवाईदरम्यान नदी पात्रातून रेती काढण्यासाठी वापरण्यात येणारे ४० तराफे, ४० ब्रास रेती, रेती उपशासाठी वापरले जाणारे ९ इंजिन तसेच ५ ब्रास रेती असा एकूण ४९ लाख २५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.काही साहित्य तेथेच जाळून टाकण्यात आले. या प्रकरणी नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता तसेच पर्यावरण संरक्षण अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दोन अनोळखी आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे.

ही कारवाई पोलीस उप अधीक्षक प्रशांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली  पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोळकर,पोलीस उप निरीक्षक व्यंकट कुसमे,पोलीस अंमलदार वसंत केंद्रे,मारोती पंचलिंग,हनुवता कदम,हणमंत तेलंग,समीर अहेमद,धम्मपाल  कांबळे आणि विनोद पवार यांनी केली.कारवाई करणाऱ्या पोलिस पथकाचे वरिष्ठांकडून कौतुक करण्यात आले.

साहित्य जाळण्याचा व्हिडिओ ….

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!