नांदेडचा विकास नेमका कुठे अडकला आहे?

नांदेड जिल्हा हा ऐतिहासिक, धार्मिक आणि सांस्कृतिक वारसा लाभलेला भाग आहे. श्री गुरू गोबिंद सिंघ यांच्या पवित्र स्मृतींमुळे नांदेडला जागतिक स्तरावर ओळख मिळाली आहे. दरवर्षी लाखो भाविक येथे येतात, त्यामुळे हा जिल्हा देशाच्या पर्यटन नकाशावर ठळकपणे झळकायला हवा होता. परंतु वास्तव चित्र पाहिले तर अनेक मूलभूत प्रश्न आजही जसेच्या तसेच आहेत—आणि काही बाबतीत परिस्थिती अधिकच बिकट होत चालली आहे. नांदेडमध्ये दहा आमदार आणि तीन खासदार असे प्रभावशाली लोकप्रतिनिधी असूनही विकासाचा वेग मात्र अत्यंत मंद आहे. हे सर्व नेते अनेक वर्षांपासून राजकारणात सक्रिय असून मोठमोठ्या पदांवर राहिलेले आहेत, तरीही आज सामान्य नागरिकांच्या मूलभूत गरजा पूर्ण होताना दिसत नाहीत.

मुख्य समस्या ज्या आजही कायम आहेत

शहरातील वाढती वाहतूक कोंडी आणि अपुरी रस्ते व्यवस्था बेरोजगारी आणि उद्योगधंद्यांचा अभाव
एमआयडीसीची अत्यंत दयनीय अवस्था, नवीन गुंतवणूक न होणे
गोदावरी नदी प्रदूषण आणि अपूर्ण स्वच्छता प्रकल्प
ऐतिहासिक गुरूद्वाऱ्यांमध्ये सरकारी हस्तक्षेप व गुरूद्वारा बोर्डच्या जमिनींचे प्रश्न
नांदेडला पर्यटनाच्या नकाशावर योग्य स्थान मिळवून देण्यात अपयश
क्रीडांगणांची कमतरता आणि तरुणांसाठी संधींचा अभाव
श्री गुरू गोबिंद सिंघ स्टेडियम आंतरराष्ट्रीय दर्जाचे न बनणे
आरोग्य सुविधा अपुऱ्या, शासकीय रुग्णालयांची स्थिती चिंताजनक, चांगला मोठ्या दवखान्याचा अभाव यामुळे उपचारासाठी परराज्यात किंवा मोठ्या शहरात नागरिकांना जावे लागते
शहराचे सुशोभीकरण व स्वच्छतेकडे दुर्लक्ष
वारंवार होणारे वीजपुरवठा खंडित होणे
नांदेड विमानतळाचा अपेक्षित विकास न होणे
शेतकऱ्यांना अपुरी मदत, सिंचन व बाजारपेठेचा अभाव
शहरामध्ये सक्षम व नियमित सीटी बस सेवेचा अभाव, ज्यामुळे सामान्य नागरिक, विद्यार्थी, कामगार व भाविकांना प्रवासासाठी मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे

अजूनही दुर्लक्षित राहिलेले मुद्दे

आजच्या स्पर्धात्मक युगात कोणत्याही शहराच्या विकासासाठी नियोजनबद्ध पायाभूत सुविधा अत्यंत आवश्यक आहेत. परंतु नांदेडमध्ये
देशविदेशातील पर्यटकांची नांदेड ला ये जा परंतु पर्यटनाचे यात्री निवास व केंद्रां पासून वंचित
स्मार्ट सिटीसारख्या योजनांचा प्रभाव दिसून येत नाही

आयटी पार्क, स्किल डेव्हलपमेंट सेंटर यांचा अभाव

शहर नियोजन (Urban Planning) अपुरे व विस्कळीत

सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अत्यंत कमकुवत असून, सुयोग्य व परवडणारी सीटी बस सेवा नसल्यामुळे खासगी वाहनांवर अवलंबित्व वाढले आहे, परिणामी वाहतूक कोंडी व प्रदूषण वाढत आहे

जलनिस्सारण (ड्रेनेज) व पाणीपुरवठा समस्या कायम

गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी ठोस धोरणांचा अभाव

प्रश्न फक्त जनतेचा नाही, प्रतिमेचाही आहे

नांदेड हे केवळ एक शहर नाही, तर देश-विदेशातील लाखो भाविकांच्या श्रद्धेचे केंद्र आहे. अशा ठिकाणी जर मूलभूत सुविधा देखील समाधानकारक नसतील, तर याचा थेट परिणाम शहराच्या प्रतिमेवर होतो.

आता अपेक्षा फक्त आश्वासनांची नाही, कृतीची आहे

आज गरज आहे ती केवळ घोषणा किंवा भाषणांची नाही, तर ठोस आणि वेळबद्ध कृतीची

रस्ते, वाहतूक व पायाभूत सुविधांचा तातडीने विकास
एमआयडीसीला नवसंजीवनी देऊन रोजगारनिर्मिती
गोदावरी स्वच्छता प्रकल्पाची प्रभावी अंमलबजावणी
नांदेडमध्ये आधुनिक, नियमित आणि परवडणारी सीटी बस सेवा तातडीने सुरू करणे
पर्यटन विकासासाठी विशेष धोरण
क्रीडा व युवकांसाठी आधुनिक सुविधा
आरोग्य व शिक्षण क्षेत्रात मोठी गुंतवणूक
विमानतळ व कनेक्टिव्हिटी सुधारणा

मनोरंजनां साठी आणखी उद्द्याने
ऐतिहासिक गुरूद्वाऱ्याला यात्रेकरू व नांदेडच्या विकासात भर टाकण्यासाठी नवीन नवीन मार्केट, यात्री निवास बांधण्यासाठी गुरूद्वारा बोर्ड च्या सर्व जमीनी आरक्षण मुक्त व स्थानिक लोकांना गुरुद्वारा प्रबंध चालविण्यासाठी देणे

सर्वसामान्य माणसाला भेडसावणारा मनातील एक शेवटचा प्रश्न

इतके सक्षम व अनुभवी नेतृत्व असताना देखील नांदेडचा विकास का मागे पडत आहे?

हा प्रश्न आज प्रत्येक नागरिकाच्या मनात आहे—आणि याचे उत्तर कृतीतूनच मिळू शकते.

 

राजेंद्र सिंघ शाहू
इलेक्ट्रिकल ट्रैनंर नांदेड
📞 7700063999

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!