समता साहित्य अकादमीच्या वतीने प्रमोद अंभोरे यांचा हैद्राबाद येथे होणार सन्मान परभणी (प्रतिनिधी) समाजकारण, पत्रकारिता आणि विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणारे परभणी जिल्ह्याचे सुपुत्र प्रमोद अशोकराव अंभोरे यांना प्रतिष्ठेचा मानला जाणारा डॉ. बाबासाहेब आंबेडकर समता राष्ट्रीय पुरस्कार – 2026 जाहीर झाला आहे. हैद्राबाद (तेलंगणा) येथे दिनांक 10 मे 2026 रोजी आयोजित राष्ट्रीय गौरव पुरस्कार सोहळा – 2026 मध्ये त्यांना हा मानाचा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. समता साहित्य अकादमीच्या वतीने दिल्या जाणाऱ्या या पुरस्कारासाठी प्रमोद अशोकराव अंभोरे यांची निवड त्यांच्या बहुआयामी सामाजिक कार्याचा सखोल आढावा घेऊन करण्यात आली आहे. सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य (रुग्णसेवा) , पत्रकारिता, सांस्कृतिक, राजकीय आणि संघटनात्मक क्षेत्रात त्यांनी सातत्याने केलेले कार्य विशेष उल्लेखनीय ठरले आहे. प्रमोद अशोकराव अंभोरे हे माता रमाबाई आंबेडकर शिक्षण प्रसारक मंडळ, परभणीचे सचिव, वंचित बहुजन आघाडी, परभणीचे तालुकाध्यक्ष, लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ, परभणीचे जिल्हा कार्याध्यक्ष, समाजहित अभियान प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष, तसेच रुग्ण हक्क संरक्षण समितीचे मराठवाडा कार्याध्यक्ष, बहुजन विकास सांस्कृतिक कला मंच मराठवाडा कार्याध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. याशिवाय ‘समाजहित न्यूज’चे तसेच सा.बंड’ वृत्तपत्राचे संपादक म्हणूनही ते सामाजिक प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील आहेत. या पुरस्कारासाठी निवड जाहीर करताना समता साहित्य अकादमीचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. डी. एस. तांडेकर, महाराष्ट्र राज्य अध्यक्ष डॉ. डी. एस. नारकर, युवा अध्यक्ष रोहित तांडेकर आणि महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष डॉ. विजय कुलदीपके यांनी प्रमोद अशोकराव अंभोरे यांना अधिकृत निवडपत्र प्रदान केले आहे. समाजातील वंचित आणि गरजू घटकांसाठी निःस्वार्थ भावनेने कार्य करणारे, निर्भीड पत्रकारिता आणि संघटनात्मक नेतृत्वाची प्रभावी सांगड घालणारे प्रमोद अशोकराव अंभोरे यांची निवड हा त्यांच्या कार्याचा योग्य सन्मान मानला जात आहे. हा पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल परभणी जिल्ह्यासह विविध स्तरांवरून प्रमोद अशोकराव अंभोरे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून त्यांच्या पुढील वाटचालीसाठी सर्वत्र शुभेच्छा दिल्या जात आहेत. Kanthak Suryatal Post Views: 624 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation भाजपाने काँग्रेसची प्रतिमा मुस्लिम धार्जिणा किंवा मुस्लिम लीग सारखा पक्ष म्हणून करण्यात आसाम मध्ये यश मिळवले ईरान – अमेरिका में फिर युद्ध शुरू होने के आसार ?