नांदेड (प्रतिनिधी) – गेली आठ वर्षापासून डॉ.बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठान यांच्यावतीने सोनारी फाटा तालुका हिमायतनगर येथे भव्य अशी बौध्द धम्म परिषद आयोजित केली जाते व दरवर्षी सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना पुरस्कार देऊन सन्मानित केले जाते यंदा ही दरवर्षीप्रमाणे याही वर्षी विविध क्षेञा मध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवराचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर समता गौरव पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येणार आहे यावर्षी डॉ. बाबासाहेब आंबेडकर समता गौरव 2026 चा पुरस्कार प्रभू सटवाजी सावंत यांना मान्यवराच्या हास्ते प्रदान करण्यात येणार आहे. प्रभू सावंत हे सेवानिवृत्त मुख्याध्यापक असून त्यांनी केवळ शिक्षण क्षेत्रातच नव्हे, तर दलित पँथर, भारिप बहुजन महासंघ, तसेच विविध शिक्षक संघटनांमध्ये कार्यरत राहून समाजातील वंचित व शोषित घटकांसाठी संघर्ष केला आहे. त्यांनी अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हा सचिव ते प्रदेश उपाध्यक्ष म्हणून काम पाहिले आहे त्यांच्या नेतृत्वात अनेक सकारात्मक सामाजिक चळवळींना गती मिळाली. प्रभु सावंत यांना आज तागायत मिळालेले मान्यताप्राप्त पुरस्कार रिपब्लिकन मित्र पुरस्कार, समाजरत्न पुरस्कार, धम्मरत्न पुरस्कार, महाराष्ट्र भूषण पुरस्कार, तुफानातील दिवे वामनदादा कर्डक जीवन गौरव पुरस्कार आंबेडकर फेलोशीप दिल्ली महात्मा फुले शिक्षक रत्न या पुरस्कारांनी त्यांच्या सामाजिक कार्याला मिळालेली दाद अधोरेखित होते. दिनांक 29 मार्च रोजी येथे भव्य बौद्ध धम्म परिषदे मध्ये मान्यवरांच्या हस्ते दिल्या जाणार आहे. प्रभु सावंत यांना हा पुरस्कार मिळताच शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय क्षेत्रातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाचे प्रदेशाध्यक्ष देविदास बस्वदे प्रा. अविनाश नाईक युवा उद्योजक तथा सामाजिक कार्यकर्ते रवींद्र सोनकांबळे वामनराव कावळे कनिष्क सोनसळे गंगाधर ओडणे उत्तम मांडणीकर मायाभाऊ नांदेडकर बि. झेड. पवार आदिने त्यांचे अभिनंदन केले आहे. Kanthak Suryatal Post Views: 690 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation साहेबराव वडणे यांचे निधन नांदेडमध्ये अवैध रेतीविरुद्ध पोलिसांची मोठी कारवाई; १ कोटी ४ लाखांहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त