नांदेड (प्रतिनिधी)- जिल्ह्यातील अवैध रेती उत्खनन व वाहतुकीविरुद्ध पोलिसांनी मोठी कारवाई करत तब्बल १ कोटी ४ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई पोलिस उपमहानिरीक्षक शाहजीउमाप यांच्या पथकाने केली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अवैध रेती उत्खनन आणि वाहतूक रोखण्यासाठी पोलिस उपमहानिरीक्षक शाहाजी उमाप यांनी आपल्या कार्यालयातील अधिकारी व अंमलदारांचे विशेष पथक माळाकोठा येथे पाठविले होते. या पथकाने ६ मार्च २०२६ रोजी रात्री सुमारे ९.३० वाजण्याच्या सुमारास पोलिस ठाणे मुदखेड हद्दीतील माळाकोठा परिसरात कारवाई केली. या कारवाईदरम्यान रेती उत्खननाच्या ठिकाणी टाटा कंपनीचे दोन हायवा, एक जेसीबी मशीन, एक लोखंडी हॉपर, एक छोटी बोट तसेच नदीपात्रातून बाहेर काढून ठेवलेली सुमारे ५० ब्रास वाळू असा एकूण १ कोटी ४ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी पोलिस ठाणे मुदखेड येथे गुन्हा क्रमांक ३९/२०२६ अंतर्गत कलम ३०३(२), ३(५), ४८(७), ४८(८) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शिंदे करीत आहेत. कारवाईदरम्यान घटनास्थळाची पाहणी केली असता माळाकोठा घाटावरून मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उपसा, साठवणूक आणि वाहतूक सुरू असल्याचेही स्पष्ट झाले आहे. या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक पंकज इंगळे यांच्यासह पोलीस अंमलदार प्रदीप खानसोळे, संजीव जिंकलबाड, गणेश धुमाळ व कामाजी गवळी यांनी सहभाग घेतला. पथकाच्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल पोलिस उपमहानिरीक्षक शाहजी उमाप यांनी सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले आहे. तसेच आपल्या परिसरातील अवैध व्यवसायांची माहिती नागरिकांनी जवळच्या पोलिस ठाण्यात किंवा nandedrange.mahapolice.gov.in या संकेतस्थळावर तसेच ९१५०१००१०० या हेल्पलाईनवर देऊन पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहनही करण्यात आले आहे. Kanthak Suryatal Post Views: 860 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation प्रभू सावंत यांना डॉ.बाबासाहेब आंबेडकर समता गौरव पुरस्कार जाहीर सोनपेठ पोलीस ठाण्यातील पोलीस अमंलदाराला ८ हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले