गंगाखेड (प्रतिनिधी) – महाराष्ट्रात पावसाच्या ओढ्यामुळे सर्वत्र भीषण दुष्काळ पसरला असून, पिके टिकवण्यासाठी आणि पाण्याचा थेंब अन् थेंब मिळवण्यासाठी बळीराजा हवालदिल झाला आहे. दुसरीकडे, राज्य प्रशासन दुष्काळ निवारणासाठी दिवस-रात्र नवरात्र मेहनत करत असल्याचा दावा करत आहे आणि शेतकऱ्यांना पिके वाचवण्यासाठी पाण्याचे अल्पसे वाटप करत असल्याच्या बाता मारत आहे. मात्र, या भीषण टंचाईच्या काळात प्रशासकीय नियोजनापेक्षा लोकप्रतिनिधींची हुकूमशाही आणि दादागिरी अधिक उफाळून आल्याचे विदारक चित्र समोर आले आहे. विष्णुपुरी येथे नदीपात्रात थेट पाईपलाईन टाकून पाणी उपसा करणाऱ्यांवर कारवाई करत वीज वितरण कंपनीने तेथील वीज पुरवठा खंडित केला होता. असाच काहीसा प्रकार जेव्हा गंगाखेड तालुक्यात समोर आला, तेव्हा गंगाखेडचे आमदार रत्नाकर गुट्टे यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना फोन करून थेट आदेशच देऊन टाकला. माझ्या भागातील वीज कापण्यापेक्षा विष्णुपुरीची लाईट तोडा, असा अजब आणि स्वार्थी सल्ला या लोकप्रतिनिधीने अधिकाऱ्यांना दिला. एवढ्यावरच न थांबता, आमदारांनी सर्वसामान्य जनतेला कायदा हातात घेण्यास उघडपणे चिथावले. आपली वीज तोडायला जर अधिकारी आले, तर त्यांना सरळ गोदावरी नदीच्या पाण्यात बुडवून टाका! असे वक्तव्य करत त्यांनी शासकीय अधिकाऱ्यांना थेट गोदावरीत जलसमाधी देण्याची धमकी दिली. पाण्याच्या नियोजनाऐवजी पाण्यात बुडवण्याची भाषा वापरणाऱ्या या वक्तव्यामुळे प्रशासकीय वर्तुळात तीव्र संताप व्यक्त होत आहे. अशा पद्धतीने कायदा व सुव्यवस्थेचा फज्जा उडवत लोकप्रतिनिधी अधिकाऱ्यांना नदीत बुडवण्याची भाषा करत असतील, तर या देशात लोकशाही उरली नसून खऱ्या अर्थाने शाही आणि जंगलराज अस्तित्वात आहे असेच म्हणावे लागेल. एकीकडे पाणीटंचाईमुळे शेतकरी संकटात सापडला असताना, दुसरीकडे लोकप्रतिनिधींची ही गोदावरीत बुडवा-बुडवी आणि बेताल वक्तव्ये म्हणजे दुष्काळग्रस्तांच्या जखमेवर मीठ चोळण्याचाच प्रकार आहे. त्यामुळे आता जनतेला दुष्काळाशी दोन हात करायचे की लोकप्रतिनिधींच्या या शाही कारभाराशी, असा उद्विग्न सवाल उपस्थित होत आहे. आमदार रत्नाकर गुट्टे यांचा व्हिडीओ …. https://vastavnewslive.com/wp-content/uploads/2026/11/WhatsApp-Video-2026-11-23-at-10.08.11.mp4 Kanthak Suryatal Post Views: 8 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation लोकशाहीचा गळाघोट की सत्ताधाऱ्यांची हुजूरगिरी? ५४ लाख खात्यांच्या बळीनंतर मेटाची डिजिटल आणीबाणी !