नांदेड – लोहा तालुक्यात 7 मार्च ते 8 मे 2026 याकालावधीत छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबीर अभियान” टप्पा 1 चे मंडळनिहाय शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. तरी परिसरातील नागरिकांनी या शिबिरास मोठ्या संख्येने उपस्थित राहून, आपल्या प्रलंबित कामाचा निपटारा करून घ्यावा, असे आवाहन लोहा तहसीलदार विठ्ठल परळीकर यांनी केले आहे. त्यानुसार लोहा तालुक्यात 7 मार्च रोजी सोनखेड याठिकाणी सामान्य जनतेच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी आणि शासनाच्या विविध कल्याणकारी योजना थेट लाभार्थ्यांपर्यंत पोहचवण्यासाठी लोहा प्रशासनाच्यावतीने“ छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबीर अभियान” टप्पा 1 चे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबीर 7 मार्च रोजी सकाळी 10 वाजता हनुमान मंदिर परिसर, पोलीस स्टेशनच्या समोर सोनखेड येथे संपन्न होणार आहे. प्रशासकीय पारदर्शकता आणि गतिमानता वाढवण्यासाठी हे शिबिर आयोजित केले आहे शिबिराचा मुख्य उद्देश शासकीय कार्यालयात हेलपाटे न घालता, नागरिकांना त्यांच्या हक्काचे दाखले, कागदपत्रे आणि योजनांचा लाभ एकाच ठिकाणी मिळावा, हा याशिबिराचा मुख्य उद्देश आहे. “ शासन आपल्यादारी या योजनेला बळकटी देण्यासाठी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. शिबिरात उपलब्ध असणाऱ्या प्रमुख सेवा – विविध दाखले वाटप, ॲग्रीस्टँक, सातबारा अद्यावत करणे, पी.एम.किसान, प्रलंबित फेरफार निकाली, तुकडेबंदी कायद्याच्या अनुषंगाने कार्यवाही, ई-मोजणी सामाजिक अर्थसहाय्य योजनांचा लाभ, पाणंद रस्त्याबाबत कार्यवाही, लोकसेवा हक्क कायदा, तात्काळ सेवा, अभिलेख दुरुस्ती, हेल्पडेस्क इतर अनुषंगिक विषय असणार आहेत. Kanthak Suryatal Post Views: 623 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान प्रभावी राबविण्याबाबत मार्गदर्शन लोहगाव येथे मोफत मोतीबिंदू तपासणी व शस्त्रक्रिया शिबिर