नांदेड : लोहगाव येथे मंगळवार, १७ मार्च २०२६ रोजी मोफत मोतीबिंदू तपासणी व शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरामध्ये रुग्णांची मोफत नेत्र तपासणी, मोफत शस्त्रक्रिया तसेच मोफत लेन्स देण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या शिबिरात तपासणीदरम्यान ज्यांना मोतीबिंदू आढळेल अशा रुग्णांना त्याच दिवशी ऑपरेशनसाठी नेण्यात येणार असून शस्त्रक्रियेनंतर २४ तासांच्या आत त्यांना घरी परत सोडण्यात येणार आहे. त्यामुळे परिसरातील गरजू व मोतीबिंदूच्या त्रासाने ग्रस्त असलेल्या नागरिकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. हे शिबिर लोहगाव येथील जनसंपर्क कार्यालय, ग्रामपंचायतीसमोर येथे आयोजित करण्यात आले आहे. शिबिराचे संयोजक दिलीप विनायकराव शिंदे असून अधिक माहितीसाठी नागरिकांनी मो. ९४२०६६९२३९ या क्रमांकावर संपर्क साधावा, असेही कळविण्यात आले आहे. Kanthak Suryatal Post Views: 545 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबीर अभियानाचे 7 मार्च रोजी सोनखेड येथे आयोजन;नागरिकांनी लाभ घेण्याचे आवाहन युद्धाच्या ६ दिवसांमध्ये ८५ लाख ते १३० लाख कोटींचा फटका आर्थिक जगाच्या अर्थकारणात बसला