भोकर (प्रतिनिधी)- येथे नांदेड जिल्ह्याचे पालक न्यायमूर्ती नीरज धोटे आले होते. त्यावेळी त्यांची भेट घेऊन नांदेड जिल्ह्यात प्रलंबित असलेल्या खटल्यांच्या पार्श्वभूमीवर न्यायाधीशांची संख्या वाढविण्याची विनंती करण्यात आली.
या वेळी नांदेड अभिवक्ता संघाचे उपाध्यक्ष वाकोडे, सचिव वाघ तसेच नांदेडचे ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. यदुपत अर्धापूरकर, ॲड. अनिल पाटील, ॲड. राम जाधव आणि ॲड. चंद्रकांत मेटकर उपस्थित होते.
न्यायमूर्ती धोटे यांनी तत्काळ दखल घेत रजिस्ट्रार जनरल, मुंबई यांना दूरध्वनीद्वारे संपर्क साधून या प्रकरणात आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश दिले.
न्यायमूर्ती धोटे यांच्या सकारात्मक भूमिकेमुळे नांदेड जिल्ह्यात न्यायाधीशांची संख्या वाढल्यास प्रलंबित खटल्यांचा निकाल लवकर लागण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
