नांदेड (प्रतिनिधी)- जिल्ह्यात नोंदणीकृत जीविक (जैविक) खत उत्पादक व पुरवठा सहकारी संस्थांबाबत प्राप्त तक्रारींच्या पार्श्वभूमीवर जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था नांदेड यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. संबंधित संस्थांकडून नियमबाह्य पद्धतीने खत वितरण व कृषी निविष्ठा विक्री केल्याचा आरोप तक्रार अर्जात करण्यात आला आहे. या संदर्भात प्राप्त झालेल्या धनराज मंत्री यांच्या तक्रारींनुसार, काही सहकारी संस्थांच्या नावे असलेल्या कृषी निविष्ठा विक्री केंद्रांमार्फत थेट शेतकऱ्यांना जैविक खतांचे वितरण करण्यात येत असून, सहकार कायद्याच्या तरतुदींचे उल्लंघन होत असल्याची बाब निदर्शनास आणून देण्यात आली आहे. तसेच संबंधित संस्थांनी शासनाच्या अनुदानित योजनांअंतर्गत खत वितरण करताना नियमांचे पालन न केल्याचा आरोपही करण्यात आला आहे. तक्रारींची दखल घेत जिल्हा प्रशासनाने उपनिबंधक, सहकारी संस्था (ता. नांदेड, मुखेड, हदगाव) शाहूराज हिरे यांना या प्रकरणाची सखोल चौकशी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, 1960 व नियम 1961 मधील तरतुदीनुसार कारवाई करण्यात येणार असल्याचे पत्रात नमूद आहे. दरम्यान, संबंधित संस्थांची नोंदणी, परवाने व विक्री प्रक्रियेची तपासणी करून आवश्यक ती कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. चौकशी अहवालानंतर पुढील निर्णय घेतला जाणार असून, नियमबाह्य आढळल्यास संबंधितांवर कठोर कारवाई होण्याची शक्यता आहे. Kanthak Suryatal Post Views: 557 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation बदलला आहे ‘शहजादा’! भोपाळच्या मैदानावरून मोदींना खुले आव्हान; राजकीय रणशिंग फुंकले ’तुम्ही कोण विचारणारे?’ चा खर्चिक परिणाम; पोलीस कर्मचाऱ्याची विचारणा केली महागात, वाचा निकाल