नांदेड (प्रतिनिधी) – गोदावरी नदी पात्रातून अवैधरित्या रेती उपसा करून वाहतूक करणाऱ्या रेती माफियाविरोधात नांदेड ग्रामीण पोलिसांनी धडक कारवाई करत तब्बल २० लाख २५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. आज पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर यांच्या मार्गदर्शनाखाली नांदेड ग्रामीण पोलीस पथक ज्यात पोलीस उप निरीक्षक व्यंकट कुसमे,पोलीस अंमलदार वसंत केंद्रे,शंकर माळगे,मारोती पंचलिंग,समीर अहेमद हे पेट्रोलिंग करत असताना २८ फेब्रुवारी २०२६ रोजी मध्यरात्री गोपनीय माहिती मिळाली. मिळालेल्या माहितीनुसार असर्जन नाका, भगतसिंग चौक परिसरात सापळा रचण्यात आला. यावेळी रेतीने भरलेला हायवा (क्र. MP-26 HP-3192) संशयास्पदरीत्या येताना आढळून आला. वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये अंदाजे ५ ब्रास रेती आढळून आली. वाहन चालकाने आपले नाव रूपेश नरहरी धुतराव (रा. जानापुरी, ता. लोहा) असे सांगितले तर हायवा मालक पप्पू पावडे (रा. नांदेड) असल्याचे निष्पन्न झाले. रेती वाहतुकीचा कोणताही वैध परवाना नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतर पोलिसांनी पंचांसमक्ष वाहनासह रेती जप्त केली. या कारवाईत हायवा वाहन – अंदाजे किंमत ₹२०,००,००० रेती (५ ब्रास) – अंदाजे किंमत ₹२५,००० असा एकूण ₹२०,२५,००० चा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२), ३(५) तसेच महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियमातील संबंधित कलमान्वये नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. Kanthak Suryatal Post Views: 1,169 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation महाशिबिर व योजनांच्या महामेळाव्यातून कायद्याची माहिती व शासकीय योजना लोकांपर्यंत पोहोचवा – न्यायमूर्ती निरज धोटे न्यायमूर्ती नीरज धोटे यांच्या कडे जिल्ह्यात न्यायाधीश संख्या वाढवण्याची मागणी