नांदेड – भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीच्या निमित्त सामाजिक न्याय विभागाअंतर्गत सामाजिक समता सप्ताह 8 ते 14 एप्रिल 2026 या कालावधीमध्ये आयोजित करण्यात आला आहे. त्या अनुषगांने आज 10 एप्रिल रोजी केंद्र शासनाच्या स्टँड अप योजनेंअतर्गत समाज कल्याण कार्यालयात मार्जीन मनी कार्यशाळा संपन्न झाली. या कार्यशाळेचे प्रमुख पाहुणे आयडीबीआय बँक मॅनेजर रामकिशन बैनवाड यांना समाज कल्याण अधिकारी गजानन नरवाडे यांच्या हस्ते पुष्पगुच्छ व भारतीय संविधानाची प्रत देवून सन्मानीत करण्यात आले. या कार्यशाळाचे अध्यक्ष समाज कल्याण अधिकारी गजानन नरवाडे होते तर वरीष्ठ समाज कल्याण निरिक्षक माधवी राठोड तसेच लक्ष्मी गायके हे उपस्थित होते. या कार्यशाळेचे प्रास्तावीक वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक लक्ष्मी गायके यांनी केले असून त्यांनी नांदेड जिल्हयातील अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांतील सहभागी 40 ते 50 लाभार्थ्यांना मनी मर्जीनचे महत्व सांगून मार्गदशन केले. यावेळी त्यांनी समाज कल्याण विभागाच्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती दिली. बँक मॅनेजर रामकिशन बैनवाड यांनी उपस्थित नवउद्योजक यांना केंद्र शासनाच्या स्टँड अप योजनेंअतर्गत महाराष्ट्र राज्याच्या अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील नवउद्योजक लाभार्थी यांना 15 टक्के मार्जीन मनी उपलब्ध करुन देण्यात येते. याबाबत सविस्तर माहिती देवून तळागाळातील उपस्थित नवउद्योजक यांना सखोल माहिती देवून मार्गदर्शन केले . केंद्र शासनाच्या स्टँड अप मार्जीन मनी कार्यशाळेअंतर्गत अध्यक्षीय समारोपात समाज कल्याण अधिकारी गजानन नरवाडे यांनी नवउद्योजकांना केंद्र शासनाच्या स्टँड अप योजनेंअतर्गत अनुसूचित व नवबौध्द घटकांतील नवउद्योजकांना 10 टक्के स्व- हिस्सा भरणा केल्यानंतर व बँकेने अर्जदारास स्टँडॲप इंडिया योजनेंतर्गत 75 टक्के कर्ज मंजूर केल्यानंतर उर्वरीत 15 टक्के मार्जीन मनी राज्य शासनार्फत देण्यात येते अशी महत्वपूर्ण माहिती देवून नवउद्योजकांना मार्गदर्शन केले .या कार्यक्रमाचे आभार समाज कल्याण निरिक्षक राणी गडगीळे यांनी तर सुत्र संचालन तालुका समन्वयक अंजली नरवाडे यांनी केले. सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी समाज कल्याण निरीक्षक संजय कदम यांनी व कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी प्ररिश्रम घेतले. या एक दिवशीय केंद्र शासनाच्या स्टँड अप मार्जीन मनी कार्यशाळा सहाय्यक आयुक्त शिवानंद मिनगीरे यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाली. Kanthak Suryatal Post Views: 701 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation नांदेडच्या नंदगिरी किल्ल्याच्या विकासासाठी निधी देण्यात यावा;अंदाज समितीच्या बैठकीत माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांची सूचना सोनू कल्याणकर खून प्रकरणात गोलू मंगनाळेच्या आई सह पाच जणांना पोलीस कोठडी