नांदेड  – जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल सहायक लतिफ इमामखान पठाण शनिवार दिनांक 28 रोजी नियत वयोमानाने सेवानिवृत झाले. यानिमित्ताने महसूल परिवाराचेवतीने निवासी उपजिल्हाधिकारी किरण अंबेकर यांचे हस्ते शाल, भेटवस्तू देऊन पठाण दांपत्याचा गौरव करण्यात आला. यावेळी तहसीलदार शंकर लाड, उषा इज्जपवार, भगवान हंबर्डे, वैद्यकीय अधिकारी डॉ. आनंद  मालशेटवार, डॉ.अनिल पोपुलवार, डॉ.पतंगे, किशोर कुऱ्हे, नीरज धामणगावे उपस्थित होते.

 प्रीती डहाळे, संदीप ढवळे यांनी पीपीटी सादरीकरणातून तर डॉ. स्वाती अलोने, रोशनसिंग ग्रंथी, प्रकाश कांबळे, सोपान गुंडाळे, बारकुजी मोरे, बालाजी जाधव यांनी मनोगतातून पठाण यांचा सेवाकाळ मांडला. प्रास्ताविक प्रसाद  शिरपूरकर आभार सिद्धार्थ बुक्तरे यांनी तर सूत्रसंचालन बालासाहेब भराडे यांनी केले. या कार्यक्रमासाठी नागरीक प्रतिनिधी बी. जी. मोरे यांचेसह विविध विभागातील अधिकारी कर्मचारी बहुसंख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!