नांदेड (प्रतिनिधी)- सहयोग सेवाभावी संस्था, इंदिरा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी – पॉलीटेक्निक, विष्णुपुरी, नांदेड येथील विद्यार्थ्यांनी क्रीडा व तांत्रिक प्रोजेक्ट स्पर्धेत उल्लेखनीय यश संपादन केले. सदरील स्पर्धाचे आयोजन ग्रामीण तंत्रनिकेतन विष्णुपुरी नांदेड येथे करण्यात आले होते. आंतरमहाविद्यालयीन क्रीडा स्पर्धेतील बॅडमिंटन प्रकारात महाविद्यालयाच्या संघाने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत उपविजेते पद पटकावले. संबंधित विद्यार्थिनींमध्ये अनुमा खंदारे, रेवती कासार, राजकौर स्नेहा व वाघमारे माधुरी यांचा समावेश होता. तसेच तांत्रिक प्रोजेक्ट स्पर्धेत शेख राफे या विद्यार्थ्याने आपल्या प्रकल्पाचे प्रभावी सादरीकरण करत द्वितीय पारितोषिक मिळवले. या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार संस्था सचिव डॉ. संतुकराव हंबर्डे, प्राचार्य शिवानंद बारसे, प्राचार्य डॉ. ईशान अग्रवाल,विभागप्रमुख बालाजी कदम, शिक्षक समन्वयक प्रवीण उमाटे, अधीक्षक शंकर किरकन यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी संस्था सचिवांनी सर्व विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करून त्यांच्या पुढील शैक्षणिक व व्यावसायिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या. Kanthak Suryatal Post Views: 562 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation मंत्री हरदीपसिंघ पुरी यांचा शब्द शोध ;वुमन अंडर एज (women under age) छत्रपती चौकात पहाट होताच मंगळसूत्र हिसकावले; भाग्यनगर पोलिसांत गुन्हा दाखल