नवीन नांदेड (प्रतिनिधी)- नांदेड ग्रामीण पोलिसांनी अवैध वाळू उपसा करणाऱ्यांविरुद्ध धडक कारवाई करत तब्बल 54 लाख 25 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई 5 फेब्रुवारी रोजी दोन टप्प्यांत करण्यात आली. नांदेड ग्रामीण पोलिस ठाण्याचे पोलीस हवालदार मारुती शंकर पंचलिंग यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, 5 फेब्रुवारी रोजी सकाळी सुमारे 10.30 वाजता तसेच दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास भणगी, वाहेगाव, पिंपळगाव (निमजी) शिवारातील नदीपात्रात पोलिसांनी छापे टाकले. या कारवाईदरम्यान अवैधरित्या वाळू उपसा सुरू असल्याचे आढळून आले. पोलिसांनी छाप्यात एकूण 45 ब्रास वाळू (किंमत 2 लाख 25 हजार रुपये), वाळू उपसा करण्यासाठी वापरली जाणारी चार इंजिने (किंमत 12 लाख रुपये) तसेच प्रत्येकी 2 लाख रुपये किमतीचे 80 तराफे (एकूण 40 लाख रुपये) असा एकूण 54 लाख 25 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी चार अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा क्रमांक 104/2026 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. ही कारवाई पोलीस उपविभागीय अधिकारी प्रशांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली नांदेड ग्रामीणचे पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोळकर, पोलीस उपनिरीक्षक व्यंकट कुसुमे तसेच अंमलदार वसंत केंद्रे, माळगे, समीर, आसिफ आणि कांबळे यांच्या पथकाने केली.सर्व तराफे 40 लाख रुपयांचे पोलिसांनी जाळून टाकले आहेत. संबंधित व्हिडीओ .. https://vastavnewslive.com/wp-content/uploads/2026/02/WhatsApp-Video-2026-02-06-at-17.07.48.mp4 Kanthak Suryatal Post Views: 723 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation नांदेड जिल्हा निर्यातीसाठी अग्रस्थानी नेणार – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले महापौर पदासाठी भाजपाकडून कविता मुळे तर उपमहापौर पदासाठी दिपकसिंह रावत यांचा अर्ज दाखल