पाणी फाउंडेशन फार्मर कप स्पर्धा २०२६ नांदेड जिल्ह्यासाठी प्रेरणादायी निवासी प्रशिक्षण पर्व सगरोळी येथे संपन्न नांदेड – पाणी फाउंडेशन फार्मर कप स्पर्धा २०२६ अंतर्गत २ ते ४ फेब्रुवारी या कालावधीत तीन दिवसीय निवासी प्रशिक्षण कार्यक्रम कृषी विज्ञान केंद्र (के.व्ही.के.), सगरोळी येथे उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. या प्रशिक्षण कार्यक्रमात जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी मार्गदर्शन करताना शेतकरी हितासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांचे कौतुक केले. बदलत्या काळात शेतीमध्ये ज्ञानाधिष्ठित, तंत्रस्नेही व वैज्ञानिक दृष्टिकोन स्वीकारणे अत्यंत आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. शेतकऱ्यांनी पारंपरिक शेतीसोबत आधुनिक तंत्रज्ञानाचा योग्य वापर करून उत्पादनवाढ, खर्च नियंत्रण व उत्पन्नवाढीचे नवे मार्ग शोधावेत, असे प्रेरणादायी आवाहन त्यांनी केले. हा कार्यक्रम नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी, मार्गदर्शक व परिवर्तनकारी ठरला. प्रशिक्षणाच्या समारोप प्रसंगी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी शेतकऱ्यांना दिलेली सदिच्छा भेट शेतकऱ्यांसाठी विशेष प्रेरणास्त्रोत ठरली. या निवासी प्रशिक्षणासाठी नांदेड जिल्ह्यातील कंधार तालुक्यातील विविध गावांतून शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. तीन दिवस चाललेल्या प्रशिक्षणात आधुनिक शेती तंत्रज्ञान, शाश्वत शेती पद्धती, गटशेती, मूल्यवर्धन, शेतीपूरक उद्योग, बाजारपेठ व्यवस्थापन तसेच शेतीतील नव्या संधी याबाबत सखोल व प्रात्यक्षिकाधारित मार्गदर्शन देण्यात आले. प्रशिक्षण काळात शेतकऱ्यांमध्ये नवचैतन्य, आत्मविश्वास आणि बदलाची सकारात्मक जाणीव स्पष्टपणे दिसून आली. या कार्यक्रमास उपसंचालक आत्मा श्रीमती अर्चना गुंजकर, कृषी विज्ञान केंद्राचे चेअरमन प्रमोद देशमुख, पाणी फाउंडेशनचे महाराष्ट्र राज्य समन्वयक सत्यवान देशमुख, नांदेड विभागीय समन्वयक प्रविण काथवटे,श्री संदीप चव्हाण सर उमेद तालुका व्यवस्थापक कंधार तसेच अश्वमेध ग्रामीण पाणलोट क्षेत्र विकास व शैक्षणिक संस्था, कंधार येथील विविध विभागांचे अधिकारी, तज्ज्ञ मार्गदर्शक व मान्यवरांची उपस्थिती लाभली. या प्रशिक्षणातून शेतकऱ्यांना आधुनिक शेतीची स्पष्ट दिशा, नव्या संधींची ओळख आणि शाश्वत शेतीचा मार्ग मिळाल्याचा अभिप्राय व्यक्त करण्यात आला. प्रशिक्षणार्थींनी तीन दिवसांच्या अनुभवांबाबत समाधान व्यक्त करत भविष्यात आपल्या शेतीत सकारात्मक बदल घडवून आणण्याचा दृढ संकल्प व्यक्त केला. Kanthak Suryatal Post Views: 676 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation प्रियंका सूर्यतळे- बावस्कर यांची तंत्रज्ञ पदावर नियुक्ती जलतारा पाणीदार नांदेडच्या दिशेने भक्कम पाऊल !