नांदेड (प्रतिनिधी)-लोहा पोलिस ठाण्याच्या हद्दीत १७ जानेवारी २०२६ रोजी साठ लाख रुपये रोख रक्कम घेऊन एक कोटी रुपयांचे सोने देण्याचे आमिष दाखवून फसवणुकीचा प्रकार घडल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणात स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिस उपनिरीक्षकांनी दिलेल्या अहवालात एका पोलिसाचाही सहभाग असल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. मात्र अद्याप संबंधित पोलिसावर कोणतीही ठोस कारवाई झालेली नसल्याने विविध चर्चांना उधाण आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, १७ जानेवारी रोजी सायंकाळी सुमारे ८.३० वाजता सचिन खेडकर यांचा नातेवाईक असलेल्या ओमकार विश्वनाथ भुरे याने एक कोटी रुपयांचे सोने देण्याचे आमिष दाखवत सचिन खेडकर यांच्याकडून साठ लाख रुपये रोख रक्कम घेतल्याचे समोर आले आहे. यासंदर्भात सचिन खेडकर यांनी पैसे घेऊन दिल्यानंतर ओमकार भुरे हा पोलीस राजेश मुंडे व त्याचे अन्य दोन साथीदारांसह साठ लाख रुपये घेऊन पळून गेल्याची कबुली दिल्याचा उल्लेख स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस उपनिरीक्षक महेश कोरे यांनी सादर केलेल्या अहवालात करण्यात आला आहे. या घटनेनंतर गुन्हा क्रमांक २३/२०२६ हा भारतीय न्याय दंड संहितेच्या कलम ३१६(२) व ३१८(४) अन्वये दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात ओमकार विश्वनाथ भुरे याला पकडून स्थानिक गुन्हा शाखेने लोहा पोलिसांना दिल्या नंतर लोहा पोलिसांनी अटक केली असून तो सध्या न्यायालयीन कोठडीत आहे.दरम्यान, पोलिस उपनिरीक्षकांनी सादर केलेल्या अहवालात पोलीस अंमलदार राजेश बाबुराव मुंडे (रा. शंकर नगरी, असर्जन, नांदेड) व त्याचे दोन साथीदार यांचाही या गुन्ह्यात सहभाग असल्याचे नमूद करण्यात आले आहे. तथापि, उपलब्ध माहितीनुसार अद्याप राजेश बाबुराव मुंडे याला अटक करण्यात आलेली नाही.या प्रकरणात एका पोलिसाचे नाव समोर येऊनही त्याच्यावर कारवाई का करण्यात आलेली नाही, असा प्रश्न नागरिकांमध्ये उपस्थित होत असून याबाबत विविध चर्चा सुरू आहेत. Kanthak Suryatal Post Views: 2,175 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation लोकशाहीचा गळा घोटून ‘ट्रेड डील’चा जल्लोष; देश विकला जातोय का? बिलोली येथे घरफोडले; देगलूरात जबरी चोरी