नांदेड, (प्रतिनिधी) – सातत्याने वर्गात क्रमवारी कायम राखत विविध सांस्कृतिक, स्पर्धात्मक परिक्षा आणि वेगवेगळ्या स्पर्धेत यश मिळविणार्या कु. मीमांसा रुपेश पाडमुखने निबंध स्पर्धत प्रथम क्रमांक मिळविल्याबद्दल प्रिन्सिपल मो. अर्शद सर यांच्यासह सर्व शिक्षक व संचालकांनी अभिनंदन केले आहे. नांदेड शहरालगत असलेल्या पासदगांव येेथे असलेल्या होलीसिटी पब्लीक स्कूलमध्ये विद्यार्थ्यांना शिक्षणासह स्पर्धात्मक युगात टिकण्यासाठी वेगवेगळ्या परीक्षा व स्पर्धा घेवून प्रोत्साहन दिल्या जाते. भारतीय राज्य घटनेवर घेण्यात आलेल्या निबंध स्पर्धेत होलीसिटीची मीमांसा पाडमुखने सहभाग घेवून प्रथम क्रमांक पटकावला आहे. शाळेतील यश मिळविलेल्या विद्यार्थ्यांचे प्रिन्सिपॉल मो. अर्शद, उपप्राचार्य सुजाता नाईक, बाळासाहेब पवार, सौ. रश्मी यंंदे, सौ. रिना साले, राजेश जामगे, सुनिल पाटील, अर्पिता कुलकर्णी आदींसह इतरांनी त्यांचे अभिनंदन केले. शाळेत संस्थेचे उपाध्यक्ष सुधाकर बंडेवार, सचिव बालाजी उत्तरवार, कोषाध्यक्ष नरेश सोमावार, कार्यकारी समितीचे अध्यक्ष काळे यांच्या हस्ते प्रथम क्रमांक मिळविणार्या कु. मीमांसा पाडमुखचा सत्कार करण्यात आला. यावेळी सहसचिव विनायक पारसेवार, येरावार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. या यशाबद्दल मीमांसाचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. Kanthak Suryatal Post Views: 474 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation आयु.प्रकाश नागोराव ढवळे यांचे निधन १% महसूलवाढ आणि १५ लाख कोटी व्याज: अर्थव्यवस्था चालते की थट्टा?