नांदेड (प्रतिनिधी) – शहरातील वजीराबाद पोलिसांनी केलेल्या कारवाईत एका 27 वर्षीय युवकाकडून गावठी पिस्तूल तसेच एक जिवंत काडतूस असा एकूण 25 हजार 500 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलीस अंमलदार ज्वाला सिंग सिद्धसिंग बावरी यांनी दिलेल्या माहितीनुसार, 14 नोव्हेंबर रोजी रात्री सुमारास 11 वाजता ते सहकाऱ्यांसह शहरात गस्त घालत होते. यावेळी बसस्थानकाजवळ संशयित व्यक्तीची तपासणी करण्यात आली. त्याची ओळख शेख अतीक शेख शफी (२७), रा. दर्गा रोड, कुर्बान अलिशा नगर, परभणी अशी पटली. तपासणीदरम्यान त्याच्याकडे एक गावठी पिस्तूल व एक जिवंत काडतूस आढळून आले. सदर शस्त्रसाठा तत्काळ जप्त करण्यात आला असून जमादार ज्वाला सिंग बावरी यांच्या फिर्यादीवरून शेख अतीक याच्याविरुद्ध भारतीय हत्यार कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईत उपविभागीय पोलीस अधिकारी रामेश्वर व्यंजने यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक राजू वटाणे, तसेच उमाकांत पुणे, पोलीस अंमलदार हबीब चाऊस, रमेश सूर्यवंशी, मारुती मुसळे, संतोष पोकळे, गणेश धुमाळ, विलास कदम आदी अधिकाऱ्यांनी सहभागी होऊन ही यशस्वी कारवाई केली. Kanthak Suryatal Post Views: 1,674 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation 2017 मध्ये लाच स्विकारणाऱ्या ग्राम विकास अधिकाऱ्याला कारावास नांदेड ग्रामीण पोलिसांनी केली अवैध वाळूसह हायवा गाडी जप्त, एकूण 40 लाख 25 हजार रुपये मुद्देमाल जप्त