नांदेड(प्रतिनिधी)-शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील महाविरनगर येथे 80 हजारांचे 3 लाख 50 हजार रुपये घेवून अजून 2 लाख रुपये देणे आहे असा प्रकार करणाऱ्याविरुध्द सावकारी कायद्यान्वये गुन्हा दाखल झाला आहे.
रुपेशसिंह अशोेकसिंह चव्हाण यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 1 मे 2020 ते 12 सप्टेंबर 2025 दरम्यान त्यांनी करणसिंघ गाडीवाले यांच्याकडून घेतलेल्या 80 हजार रुपयानंतर 24 महिन्यात 13 टक्के दराने व्याज दिले होते. आजपर्यंत करणसिंघला 3 लाख 50 हजार रुपये देवून सुध्दा अजून 2 लाख देणे आहे असे सांगून करणसिंघ गाडीवाले हा त्यांना जिवेमारण्याची धमकी देत होता. शिवाजीनगर पोलीसांनी हा प्रकार गुन्हा क्रमांक 342/2025 प्रमाणे दाखल केला असून महिला पोलीस उपनिरिक्षक गायकवाड अधिक तपास करीत आहेत.
80 हजारांचे 3 लाख 50 हजार घेतले तरी 2 लाख शिल्लक
