नांदेड (प्रतिनिधी)- जिल्ह्यात घरफोडी व चोरीच्या घटनांत वाढ होत असल्याचे समोर आले आहे. विविध ठिकाणी घडलेल्या तीन घटनांमध्ये चोरट्यांनी सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम असा एकूण लाखोंचा ऐवज लंपास केला आहे. याप्रकरणी विविध पोलीस ठाण्यांत गुन्हे दाखल करून तपास सुरू करण्यात आला आहे. कुंटूर येथे घरफोडी नायगाव तालुक्यातील नवी आबादी कुंडूर येथे 16 मार्च रोजी मध्यरात्री 12.15 ते 2.00 वाजण्याच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी घराचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला. कपाटातील सुमारे 72,700 रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने चोरून नेले. या प्रकरणी फिर्यादी फारुक गुलामसाब शेख (वय 30) यांच्या तक्रारीवरून कुंटूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मांडवी येथे दुसरी घटना किनवट तालुक्यातील रामजी नाईक तांडा येथे 15 मार्च रोजी दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास घरफोडीची घटना घडली. आरोपी विकास विजय आडे (वय 25) याने घराचे कुलूप तोडून आत प्रवेश करत 20 हजार रुपये रोख रक्कम व सुमारे 32 हजार रुपयांचे दागिने असा एकूण 52 हजारांचा ऐवज चोरला. या प्रकरणी मनोहर अमरसिंग जाधव (वय 45) यांच्या तक्रारीवरून मांडवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. भोकर येथे चोरी भोकर येथील विश्वकर्मा नगर परिसरात 17 मार्च रोजी दुपारी 1.05 ते 1.10 दरम्यान अज्ञात इसमाने घराबाहेर उभी असलेल्या स्कूटीच्या डिकीत ठेवलेली 1 लाख 70 हजार रुपयांची रोख रक्कम चोरून नेली. या प्रकरणी वैभव पंडित राठोड (वय 23) यांच्या फिर्यादीवरून भोकर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलीस तपास सुरू सर्व घटनांमध्ये भारतीय न्याय संहिता-2023 अंतर्गत संबंधित कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले असून, पोलीस पुढील तपास करत आहेत. जिल्ह्यात वाढत्या घरफोडीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये चिंता व्यक्त होत आहे. Kanthak Suryatal Post Views: 772 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation अली लारी जानीच्या हत्येनंतर इस्रायलवर क्षेपणास्त्रांचा वर्षाव गुरुद्वारा दुरुस्ती प्रकरणातील शासनाकडून विलंबावर उच्च न्यायालयाची कडक दखल