रमजानच्या पवित्र महिन्यात इज्रायल आणि अमेरिकेने मोहरम महिन्यातील बलिदाचे रेखाटले चित्र इराणचे वरिष्ठ सुरक्षा सल्लागार अली लारी जानी यांच्या मृत्यूची अधिकृत पुष्टी इराणने केली आहे. यासोबतच इराणच्या लष्करी नेतृत्वावर मोठा आघात झाला असून, वरिष्ठ कमांडर गोलाम रजा सुलेमानी यांच्याही मृत्यूची माहिती समोर आली आहे. सुरुवातीला या बातम्यांबाबत संभ्रम होता, मात्र आता इराणने स्पष्ट शब्दांत याची खात्री दिली आहे. इराणच्या लष्करी अधिकाऱ्यांनी संतप्त प्रतिक्रिया देत जाहीर केले या हल्ल्याचा बदला घेतल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही. अली लारी जानी यांना “शहीद” घोषित करण्यात आले असून, त्यांच्या मृत्यूला थेट युद्धाची ठिणगी मानले जात आहे. अहवालानुसार, अमेरिका–इस्रायलच्या संयुक्त कारवाईत हे हल्ले करण्यात आले. अली लारी जानी हे इराणच्या राजकारणातील अत्यंत प्रभावशाली आणि धोरणात्मक निर्णय घेणारे नेते होते. 2008 ते 2020 दरम्यान ते इराणच्या संसदेचे सभापती होते आणि अली खामेनाई यांचे विश्वासू मानले जात होते. त्यांच्या मृत्यूमुळे इराणच्या सत्ताकेंद्रावर मोठा धक्का बसला आहे. इराणचा प्रतिहल्ला या हत्येनंतर इराणने अक्षरशः संतापाचा स्फोट करत इस्रायलवर शेकडो क्षेपणास्त्रांचा मारा सुरू केला. काही अहवालांनुसार हा आकडा हजाराच्या घरात गेला असल्याचे सांगितले जाते. मध्य आणि दक्षिण इस्रायलमधील अनेक शहरांमध्ये स्फोटांचे आवाज घुमले, इमारतींना मोठे नुकसान झाले आणि भीतीचे वातावरण पसरले. विशेषतः रेल्वे स्थानके, औद्योगिक प्रकल्प आणि नागरी भागांना लक्ष्य करण्यात आले. काही ठिकाणी आग लागल्याचे, इमारती कोसळल्याचे आणि बचाव पथके ढिगाऱ्यात अडकलेल्या लोकांचा शोध घेत असल्याचे दृश्य समोर आले आहे. आंतरराष्ट्रीय प्रतिक्रिया इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यानाहू यांनी दावा केला की,आम्ही इराणच्या धोकादायक नेतृत्वाला लक्ष्य केले आहे. मात्र तुर्कस्तानसारख्या देशांनी या हल्ल्यांचा निषेध करत, इराणी नेत्यांची हत्या आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन असल्याचे स्पष्ट केले. रशियानेही अप्रत्यक्ष पाठिंबा दर्शवला असल्याच्या चर्चा रंगल्या असून, त्यामुळे इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यांची अचूकता वाढल्याचा दावा काही अहवालांमध्ये करण्यात आला आहे. युद्ध आणखी भडकण्याची चिन्हे रमजानच्या पवित्र महिन्यात घडलेल्या या हल्ल्यांनी परिस्थिती अधिकच संवेदनशील केली आहे. इराणमध्ये लाखो लोक रस्त्यावर उतरले, बदला घ्या च्या घोषणा दिल्या गेल्या. शहादत (बलिदान) ही इराणी संस्कृतीतील महत्त्वाची भावना असल्याने, प्रत्येक हल्ल्यानंतर त्यांची लढण्याची भूमिका अधिक आक्रमक होताना दिसत आहे. इराणने स्पष्ट संदेश दिला आहे,“क्षेपणास्त्रे संपेपर्यंत नाही, तर शेवटच्या क्षेपणास्त्रापर्यंत आम्ही लढू!” अमेरिकेतही मतभेद या युद्धावरून अमेरिकेतही मतभेद उघड झाले आहेत. वरिष्ठ जो केंट यांनी या संघर्षाला विरोध करत राजीनामे दिल्याच्या बातम्या समोर आल्या आहेत. त्यांचे म्हणणे स्पष्ट आहे.“इराणकडून तात्काळ धोका नव्हता; तरीही हे युद्ध राजकीय दबावाखाली सुरू केले गेले.” जो केंटच्या पत्नी सैनिक होत्या त्या सीरिया युद्धात मारल्या गेल्या होत्या. निष्कर्ष इराणच्या वरिष्ठ नेत्यांच्या हत्येनंतर परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे. हा फक्त एका व्यक्तीचा मृत्यू नाही हा थेट राष्ट्राच्या सत्ताकेंद्रावर हल्ला आहे. आता हा संघर्ष केवळ इराण आणि इस्रायलपुरता मर्यादित राहिलेला नाही, तर तो जागतिक स्तरावर मोठ्या युद्धात परिवर्तित होण्याच्या उंबरठ्यावर आहे. जग तणावात आहे… आणि पुढचा स्फोट कधी होईल, याची कुणालाच खात्री नाही. मरण पावलेले नेते अली लारी जानी आणि गोलाम रजा सुलेमानी राजीनामा देणारे अमेरिकेतील वरिष्ठ अधिकारी जो केंट Kanthak Suryatal Post Views: 771 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation नांदेड ग्रंथोत्सव-2025;आयोजित वाचकांनी केली विक्रमी खरेदी ; दहा लाख रुपयांची ग्रंथविक्री नांदेड जिल्ह्यात घरफोडी व चोरीच्या घटना; लाखोंचा ऐवज लंपास