नवीन नांदेड (प्रतिनिधी)- नांदेड ग्रामीण पोलिसांनी बेकायदेशीर वाळू वाहतुकीवर मोठी कारवाई करत ४० लाख रुपये किमतीचा हायवा आणि २५ हजार रुपये किमतीची वाळू जप्त केली आहे. ही कारवाई १० फेब्रुवारी रोजी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास वांगी ते वाजेगाव वळण रस्त्यावर करण्यात आली. पोलीस अंमलदार धम्मपाल ज्ञानोबा कांबळे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, नांदेड ग्रामीणचे पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोळकर हे स्वतः आणि पोलीस अंमलदार वसंत केंद्रे, जमीर,आसिफ यांच्यासह गस्त घालत होते. दरम्यान, सायंकाळी सुमारे ७.३० वाजता वांगी ते वाजेगाव वळण रस्त्यावर संशयित एमएच २६ बीबी २८७८ क्रमांकाचा हायवा थांबवून तपासणी करण्यात आली. तपासणीदरम्यान संबंधित वाहनामध्ये बेकायदेशीररीत्या वाळूची वाहतूक होत असल्याचे आढळून आले. यानंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत सुमारे ४० लाख रुपये किमतीचा हायवा आणि २५ हजार रुपये किमतीची वाळू असा एकूण ४० लाख २५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी वाहन चालक सुनील देविदास तारू (रा. वांगी, ता. व जि. नांदेड) याच्याविरुद्ध गुन्हा क्रमांक १२२/२०२५ दाखल करण्यात आला आहे.दरम्यान, या यशस्वी कारवाईबद्दल इतवारा उपविभागाचे पोलीस उपअधीक्षक प्रशांत शिंदे यांनी नांदेड ग्रामीण पोलिसांचे कौतुक केले आहे. Kanthak Suryatal Post Views: 764 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation मुखेड तालुक्यात भूकंपाचे सौम्य धक्के नागरिकांनी सतर्क राहण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन बोलीभाषेपेक्षा प्रमाण भाषेवर जास्त फोकस केल्याने वाचन संस्कृती रुजत नाही -जिल्हाधिकारी राहुल कर्डिले