नांदेड (प्रतिनिधी)- सर्वसामान्य नागरिकांना सोयीस्कर बँकिंग सेवा देण्यासाठी ओळखली जाणारी बँक ऑफ महाराष्ट्रची चिख्खलवाडी शाखा सध्या अनावश्यक कागदपत्रांच्या मागणीमुळे चर्चेत आली आहे. आज एका 8 वर्षांच्या मुलाचे जॉईंट सेव्हिंग खाते उघडण्यासाठी एक नागरिक शाखेत गेले असता, कर्मचाऱ्यांनी आधार कार्ड, पॅन कार्ड, जन्म दाखला, शाळेचे बोनाफाईड सर्टिफिकेट यासोबतच लाईट बिल, घराची रजिस्ट्री, भाडेकरार अशा अतिरिक्त कागदपत्रांची मागणी केली. विशेष म्हणजे, आरबीआयच्या नियमांनुसार आवश्यक कागदपत्रे सादर करण्याची तयारी दर्शवूनही कर्मचाऱ्यांनी अतिरिक्त अटी घातल्याची तक्रार करण्यात आली आहे. याविषयी त्या नागरिकांनी कर्मचाऱ्यांशी चर्चा केली असता समाधानकारक उत्तर मिळाले नाही. त्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता, त्यांनी उपलब्ध कागदपत्रे पुरेशी असल्याचे मान्य करून खाते उघडण्याच्या सूचना दिल्या. मात्र संबंधित कर्मचारी आपल्या भूमिकेवर ठाम राहिल्याने ग्राहकांना नाहक त्रास सहन करावा लागला. शाखा व्यवस्थापक रजेवर असल्याचे सांगण्यात आले असून संपर्क क्रमांक देण्यासही टाळाटाळ करण्यात आली. एकेकाळी उत्कृष्ट सेवेसाठी प्रसिद्ध असलेल्या या शाखेत अशा प्रकारचा कारभार होत असल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. या प्रकरणाची दखल घेऊन रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया तसेच जिल्हाधिकारी यांनी हस्तक्षेप करून बँकिंग सेवेत पारदर्शकता व सुलभता सुनिश्चित करावी, अशी मागणी करण्यात येत आहे. Kanthak Suryatal Post Views: 773 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation गुरुद्वारा दुरुस्ती प्रकरणातील शासनाकडून विलंबावर उच्च न्यायालयाची कडक दखल प्रेगाबालिन कॅप्सूल (नशेच्या गोळ्या) ची अवैध विक्री उघड